‘या’ प्रकरणी जितेंद्र आव्हाड अडचणीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्राचे गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड  यांच्या  अडचणी वाढल्या आहेत. कारण सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांच्या मारहाण प्रकरणात न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्धच्या त्यांच्या मोबाईल फोनचा संपर्क तपशील नोंद (सीडीआर) काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. अंबानी स्फोटक प्रकरण आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह मंत्र्यांवर झालेल्या आरोपांमुळे अगोदरच घायाकुतीला आलेल्या महाविकासआघाडी सरकारच्या अडचणीत ‘या’ प्रकरणामुळे आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

यायाबाबत अधिक माहिती अशी कि, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोस्ट टाकल्याचा आरोप करत इंजिनिअर अनंत करमुसे यांना घरातून नेऊन आव्हाड यांच्या बंगल्यात मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्यावेळी मंत्री आव्हाड उपस्थित असल्याचे करमुसे यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते. ५ एप्रिल २०२० रोजी मध्यरात्री करमुसे यांना घरातून आव्हाडांच्या सुरक्षा व्यवस्थेतील तिघा पोलीस शिपायांनी नेले होते. या प्रकरणी सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नोंद झाली होती.

मारहाण प्रकरणी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानेपोलिसांना दिले होते. तर पीडित अनंत करमुसे याने या मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना आरोपी करावे व या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. गिरीश कुलकर्णी यांच्यासमोर होती. आव्हाड, त्यांचे अज्ञात समर्थक व पोलिसांविरुद्ध अपहरण, मारहाणीप्रकरणी ८ एप्रिल रोजी गुन्हा नोंदविला होता. करमुसे यांच्या म्हणण्यानुसार, ५ एप्रिल रोजी त्याच्या घरी पोलीस आले आणि त्याला पोलीस ठाण्यात जायचे, असे सांगण्यात आले. पण त्याऐवजी त्याला आव्हाड यांच्या बंगल्यात नेण्यात आले. तिथे त्यांना १० ते १५ माणसांनी मारले. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

You might also like