प्रिय अण्णा…आपण माजी सैनिक आहात, लष्करात होणाऱ्या सैन्य भरतीवर तुम्हीही…; आव्हाडांच्या खोचक शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ समाजसेवक तथा माजी सैनिक असलेले अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर्षीही त्यांना वाढदिवसाच्या खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. “प्रिय अण्णा…आपण लष्करातील माजी सैनिक आहात त्यामुळे भयंकर महागाई ,वाढती बेरोजगारी यावर तर सोडाच परंतु आता लष्करात देखील कंत्राटी पद्धतीने सैनिक भरती करणार आहेत त्यावर तुम्ही किमान बोलाल ह्याच आशेसह आपणांस हार्दिक शुभेच्छा, असे खोचक ट्विट आव्हाड याणी केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे कि, ‘प्रिय अण्णा, आपण लष्करातील माजी सैनिक आहात. त्यामुळे भयंकर महागाई, वाढती बेरोजगारी, सामाजिक तेढ, ढासळती आर्थिक पत यावर तर सोडाच परंतु आता लष्करात देखील कंत्राटी पद्धतीने सैनिक भरती करणार आहेत. त्यावर तरी किमान वाढदिवसाच्या निमित्ताने बोलाल याच आशेसह आपणांस हार्दिक शुभेच्छा.’

भारतीय सैन्य दलात भरतीसाठी केंद्र सरकारने तयार केलेली अग्निपथ योजना संरक्षण मंत्री राजनाथ सिह यांनी काल जाहीर केली आहे. भारतीय सैन्यदलांत 17.5 ते 21 वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी मिळणार आहे. मात्र, यावर विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. तोच धागा पकडून आव्हाड यांनी हे ट्विट केले आहे.

Leave a Comment