हिंसाचाराचा कट २८ ऑक्टोबरलाच रचला गेला : अभाविप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । जेएनयू हिंसाचाराबाबत आज सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पत्रकार परिषद घेतली. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि व्हायरल झालेल्या चॅटची चौकशी झाली पाहिजे. ते म्हणाले की त्या ग्रुपची सर्व संख्या तपासली पाहिजेत जेणेकरुन त्याची सत्यता कळू शकेल.

अभाविपच्या सरचिटणीस निधी त्रिपाठी म्हणाल्या की जेएनयू हिंसाचारावर चर्चा होत आहे पण ती फक्त ५ जानेवारीपर्यंतच मर्यादित आहे. पण हे पाहावे लागेल की हिंसाचार फक्त ५ जानेवारीला झाला नव्हता. २८ ऑक्टोबर २०१९ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत कॅम्पसमधील वाद काय होता हे पहावे लागेल.

हे आंदोलन फक्त फीवाढी विरोधातलेच आंदोलन आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल असे निधी त्रिपाठी यांनी सांगितले. हा जेएनयूवर नक्षलवादी हल्ला होता. याची कथा २८ ऑक्टोबर २०१९ रोजी लिहिलेली होती, जी रक्तपात आणि मारहाणीच्या घटनेनंतर ५ जानेवारी २०२० रोजी हिंसाचाराच्या रुपात बाहेर आली होती.

५ जानेवारी रोजी संध्याकाळी जेएनयूमध्ये प्रचंड हिंसाचार झाला. पेरियार वसतिगृह तोडण्यात आले. मुखवटा घातलेल्या लोकांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना हॉकी स्टीक आणि लाठ्यांनी मारहाण केली. या घटनेत जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयेशी घोष हिला गंभीर दुखापत झाली.

या घटनेनंतर देश ढवळून निघाला. यानंतर संपूर्ण देशभरात हिंसाचाराविरोधात प्रदर्शने झाली.

Leave a Comment