Mumbai Best मध्ये नोकरीची संधी; 8 वी आणि 10 वी पास उमेदवारांना करता येणार अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण की, बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट अंतर्गत म्हणजेच मुंबई बेस्टअंतर्गत (Mumbai Best) विविध जागांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले जात आहे. अर्ज करण्याचे अंतिम तारीख 20 मे 2024 आहे. महत्वाचे म्हणजे या भरती प्रक्रियांतर्गत 8 वी आणि 10 वी पास उमेदवार ही अर्ज करु शकतात. त्यामुळेच इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांसाठी त्वरीत अर्ज करावा.

पदाचे नाव

“बस चालक, बस वाहक” या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.

शैक्षणिक पात्रता

रिक्त पदासाठी 8 वी आणि 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज पद्धत

ऑनलाईन मोड (Email)

इमेलचा पत्ता

[email protected] याठिकाणी अर्ज पाठवावा.

अर्जाची अंतिम तारीख

20 मे 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत.

अधिकृत वेबसाईट

https://www.bestundertaking.com

या पद्धतीने करा अर्ज

  • या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
  • वर दिलेल्या ईमेलवर उमेदवाराने Resume अर्ज समिट करावा.
  • अर्ज पूर्ण भरलेला असावा अर्जासहित आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पहावी.