आयकर विभागात नोकरीची संधी!! 100 रिक्त पदांसाठी होणार भरती; अर्जाची अंतिम तारीख पहा

0
1
Job Opportunity
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केरळमधील आयकर विभागाने (Income Tax) ‘स्टेनोग्राफर ग्रेड-I’ या पदासाठी भरती जाहीर केली आहे. याभरती अंतर्गत एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना 31 मार्च 2025 या तारखेपर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या भरतीतून ‘स्टेनोग्राफर ग्रेड-I’ पदासाठी नियुक्ती केली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि अन्य अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. या भरतीतून 100 उमेदवारांची निवड केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात आली आहे.

वयोमर्यादा आणि वेतनश्रेणी

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 56 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 35,400/- ते 1,12,400/- या वेतनश्रेणीत मासिक वेतन दिले जाणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

आयकर आयुक्त (प्रशासन आणि टीपीएस),
7 वा मजला, आयकर भवन,
जुना रेल्वे स्टेशन रोड,
कोची – 682018

अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सूचना

उमेदवारांनी अर्ज पाठवण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. तसेच, अधिक माहितीसाठी संबंधित अधिकृत संकेतस्थळ किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा. या भरतीअंतर्गत 31 मार्च 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहे.