Saturday, March 25, 2023

Job in SBI: जर तुम्हालाही वार्षिक 10 लाख रुपये कमवायचे असतील तर आजची शेवटची आहे संधी, असा अर्ज करा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने तरुणांना संधी देण्यासाठी वॅकेंसी काढलेल्या आहेत. जूनमध्ये बँकेने Executive आणि Senior Executive पदांसाठी वॅकेंसी काढलेल्या आहेत. ज्यासाठी फॉर्म भरण्याची तारीख ही 23 जूनपासून सुरू झाली आहे. आज 13 जुलै 2020 रोजी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. या सर्व रिक्त जागा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काढलेल्या आहेत.

रिक्त जागांबद्दल संपूर्ण माहिती
एसबीआयने Executive आणि Senior Executive या पदांसाठी रिक्त जागांची घोषणा केलेली आहे, Executive(FI and MM) 241 जागा आहेत तर Senior Executive (Social Banking & CSR) साठी 85 जागा आहेत.

- Advertisement -

किती असेल पगार
यामध्ये Executive (FI and MM) साठी वार्षिक 6 लाख रुपयांचे पॅकेज निश्चित केले गेले आहे तर Senior Executive (Social Banking & CSR) साठी वार्षिक 10 लाख रुपयांचे पॅकेज निश्चित केले गेले आहे.

शैक्षणिक पात्रता
Executive (FI and MM) साठी पदवी आवश्यक आहे.तसेच Senior Executive (Social Banking & CSR) साठी पदव्युत्तर पदवीसह किमान 3 वर्ष काम करण्याचा अनुभव आवश्यक आहे.

वयाची अट
Executive (FI and MM) साठी कमाल 30 वर्षे आणि Senior Executive (Social Banking & CSR) साठी साठी 35 वर्षांहून अधिक वर्षे निश्चित केली आहेत.

निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

अर्ज कसा करावा
या पदांवर अर्ज करायचा असेल तर एसबीआयच्या www.sbi.co.in च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. नंतर पेजच्या शेवटी आपल्याला करिअर लिंक वर क्लिक करावे लागेल. तुम्हाला त्यासाठी 13 जुलै पर्यंतच अर्ज करावा लागेल. कारण आज शेवटची तारीख आहे

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.