“तिसरं महायुद्ध हाच एकमेव पर्याय”; जो बायडेन यांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात अत्यंत अटीतटीची लढाई सुरु आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जागतिक स्तरावर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान काल या युद्धात संयुक्त राष्ट्रांशी संबंधित २८ देशांनी युक्रेनला सामरिक मदत करण्याची घोषणा केली आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आज मोठे वक्तव्य केले आहे. आता तिसरे महायुद्ध हाच एकमेव पर्याय आहे, असे म्हणत त्यांनी गंभीर इशारा दिला आहे.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी रात्री दिलेल्या निवेदनामध्ये तिसऱ्या जागतिक महायुद्धाचा उल्लेख केला आहे. “आता तिसर्या महायुद्धाशिवाय कोणता पर्याय नाही. जर तिसरे जागतिक महायुद्ध टाळायचे असेल, तर रशियावर निर्बंध घालणे अत्यावश्ययक आहे. युक्रेनकडे सध्या दोन पर्याय आहेत. एक तर तिसरे जागतिक महायुद्ध सुरू करा आणि थेट रशियन सैन्याशी आमने-सामने लढा. किंवा दुसरा म्हणजे जो देश (रशिया) आंतरराष्ट्रीय नियमच पाळत नाही, त्यांच्या विरोधात वागतोय, त्या देशाला त्यासाठी किंमत चुकवायला लावा”, असे बायडेन यांनी म्हटले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून रशियाच्या सैन्यदलाकडून युक्रेनची राजधानी कीवर हल्यावर हल्ले केले जात आहेत. कीवमधल्या अनेक इमारती रॉकेट हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झाल्या आहेत. मात्र, तरीदेखील युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की कीवमध्येच असून त्यांनी रशियन फौजांना तोडीस तोड उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्याच्या निर्धारानंतर यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

Leave a Comment