अमेरिकेच्या विरोधाला न जुमानता पत्रकार डॅनियल पर्लच्या मारेकऱ्याची सुटका, पाकिस्तानच्या सेफ हाऊसमध्ये हलविण्यात आले

इस्लामाबाद | अमेरिकेचे पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या हत्येचा आरोपी असलेला अल-कायदाचा दहशतवादी अहमद उमर सईद शेख याला अमेरिकेच्या निषेधानंतरही पाकिस्तानमधील सेफ हाऊसमध्ये हलविण्यात आले आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) डॅनियल पर्ल मर्डर प्रकरणातील (Pearl Murder) आरोपींची सुटका स्थगित करण्याची सरकारची विनंती नाकारली.

गुरुवारी अल कायदाचा दहशतवादी अहमद उमर सईद शेख आणि त्याच्या तीन साथीदारांना डॅनियल पर्लच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. या निर्णयावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली. पर्लच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला ‘संपूर्ण न्यायाचा खून’ म्हटले आहे.

प्रकरण तपशीलवार जाणून घ्या
2002 साली पाकिस्तानच्या कराची शहरात डॅनियल पर्लची हत्या झाली होती. डॅनियल पर्ल हे वॉल स्ट्रीट जर्नलचे दक्षिण आशिया ब्यूरोचे प्रमुख होते. 2002 साली, डॅनियल पर्ल कराची येथे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि अल कायदा यांच्यातील संबंधांविषयीच्या बातमीसाठी माहिती गोळा करीत होते. दरम्यान, त्याचे अपहरण करण्यात आले आणि नंतर त्यांनी शिरच्छेद करून हत्या केली गेली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like