खळबळजनक!! वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने पत्रकाराची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूर मधील संगमेश्वर महाविद्यालयात पत्रकारितेचं शिक्षण घेऊन प्रथम क्रमांकान उत्तीर्ण झालेला आणि अनेक दैनिकांमध्ये काम करणाऱ्या प्रकाश जाधव या युवा पत्रकाराने डाव्या हाताची नस कापून राहत्या घरीच आत्महत्या केलीय. प्रकाश जाधव यांच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार करायचे होते. मात्र पित्याच्या मृत्यूने खचलेल्या मुलाने स्वतःचीच जीवनयात्रा त्या अगोदरच संपवली.

प्रकाशची आई आणि वाहिनी कोरोना पॉसिटीव्ह असल्याने त्यांच्यावर ही सोलापुरातील हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरु आहेत. घरातील साऱ्याच व्यक्तींना कोरोनाची लागणं झाल्याने प्रकाश आणि भाऊ सतीश हे दोघंही विलगीकरणात राहत होते. मात्र मानसिक मनोबल खचलेल्या प्रकाशने टोकाचं पाऊल उचलून स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. प्रकाश याने डाव्या हाताची नस कापल्याने त्याला बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

त्याचा भाऊ सतीश जाधव हा सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत आहे. प्रकाश जाधव सारख्या हरहुन्नरी युवा पत्रकाराने आत्महत्या केल्याने सोलापुरातील पत्रकारांमधून हळहळ व्यक्त केली जातं आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like