हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (JP Nadda On RSS) एक मोठं विधान केलं आहे. सुरुवातीला भाजपला संघाची गरज लागायची, आता आम्ही सक्षम झालोय असं त्यांनी म्हंटल आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळाच्या तुलनेत भाजपमधील आरएसएसची उपस्थिती कशी बदलली आहे? या प्रश्नाला उत्तर देताना जेपी नड्डा म्हणाले की, पक्षाची रचना मजबूत झाली आहे. आता भाजप स्वबळावर चालतो. भर निवडणुकीच्या काळात नड्डा यांनी केलेले हे विधान चर्चेत आलं आहे.
भाजप स्वतःच स्वतःला चालवत आहे- JP Nadda On RSS
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत जेपी नड्डा यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले, वाजपेयींच्या काळात पक्षाला स्वतःला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती कारण त्यावेळी भाजप कमी सक्षम आणि लहान पक्ष होता. त्यामुळे आम्हाला आरएसएसची (JP Nadda On RSS) गरज होती. मात्र आता आम्ही मोठे झालो आहोत, पूर्वीपेक्षा आम्ही अधिक सक्षम झालो असून भाजप स्वतःच स्वतःला चालवत आहे.
भाजपला आरएसएसच्या पाठिंब्याची गरज आहे का, असा सवाल केला असता जेपी नड्डा म्हणाले की, भारतीय जनता पक्ष मोठा झाला आहे आणि पक्षाचे नेते त्यांची भूमिका आणि कर्त्यव्य व्यवस्थित पार पाडत आहेत. आरएसएस ही सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे, तर भाजप हा राजकीय पक्ष आहे. आरएसएस वैचारिकपणे काम करत आहे. तर आम्ही आमचा कारभार आमच्या पद्धतीने हाताळतो. आणि हेच राजकीय पक्षांनी केले पाहिजे,” असे जेपी नड्डा यांनी म्हंटल.