Jugad Video Viral | आपल्या भारतामध्ये जुगाडी लोकांची अजिबात कमतरता नाही. काही काही लोक असे जुगाड शोधून काढतात की, ते एखाद्या इंजिनीयरला किंवा कुठल्या मशीनला देखील जमणार नाही. सोशल मीडियावर असे विनोदी व्हिडिओ आपण रोज पाहत असतो. वेगवेगळा कंटेंट आपल्याला पाहायला मिळतो. परंतु सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ असतात. ज्यात लोक स्वतःच लोक चालून असं काहीतरी तयार करतात. ज्याचे सगळ्यांना आश्चर्य वाटते .
असाच एक व्हिडिओ (Jugad Video Viral ) सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाने चक्क स्मार्ट फोनचा टच खराब झालेला मोबाईलचा टच सुरू केलेला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका तरुणाने आपला मोबाईल खराब झाल्यावर माऊसच्या मदतीने ऑपरेट करण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचे हे जुगाड पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलेले आहे.
मोबाईलला लावला माऊस | Jugad Video Viral
सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एका मुलाने मोबाईलचा डिस्प्ले खराब झाल्यावर माऊसच्या मदतीने मोबाईल चालवायला सुरुवात केलेली आहे. अनेकवेळा आपल्या हातून मोबाईल पडल्यावर त्याची स्क्रीन तुटते आणि डिस्प्ले फुटल्यावर ती नवीन डिस्प्ले लावायला खूप खर्च लागतो. हाच मोबाईल वापरता देखील येत नाही. परंतु व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका मुलाच्या हातात तुटलेला फोन आहे. जेव्हा त्याला विचारले की, हा खराब असलेला फोन कसा वापरतो? तेव्हा तो त्याच्या खिशातून माऊस काढतो आणि मोबाईलला जोडतो आणि त्याची खास गोष्ट म्हणजे तो पाऊस फोनवरही काम करतो. व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ (Jugad Video Viral ) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला 1 लाख 24 हजार पेक्षा अधिक वेळा पाहिले गेले आहे. तसेच 4000 पेक्षा जास्त लाईक व्हिडिओला आलेले आहे. अनेक युजर्स या व्हिडिओला कमेंट करत आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, “काय मूर्खपणा आहे फक्त माऊस हलवून फोन कसा चालतो? अशाप्रकारे या व्हिडिओवर काही सकारात्मक तर काही नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.