Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खान लवकरच लग्न करणार? ‘त्या’ व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sara Ali Khan) बॉलिवूड सिनेविश्वाची लाडकी अभिनेत्री सारा अली खान ही सोशल मीडियावर कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. न केवळ प्रोफेशनल तर पर्सनल कारणांमुळे सुद्धा सारा चर्चेचा विषय बनते. सारा अली खान आज बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो तिच्याबाबत जाणून घेण्यासाठी कायम उत्सुक असतो. अशातच सारा अली खानच्या लग्नासंदर्भात अनेक चर्चा सुरु आहेत. असे म्हटले जात आहे की, सारा अली खान या वर्षभरात लग्न करणार आहे. त्यामुळे आता सारा कुणासोबत लग्नगाठ बांधणार याविषयी सगळ्यांना उत्सुकता वाटते आहे.

यावर्षी सारा लग्न करणार ?? (Sara Ali Khan)

सध्या सारा अली खानच्या लग्नाबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. असे सांगितले जात आहे की, अभिनेत्री सारा अली खान या वर्षात लग्न करू शकते. सोशल मीडियावर तशा बऱ्याच पोस्ट व्हायरल होत आहेत. दरम्यान, अभिनेत्रीच्या लग्नासंदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते आहे. ज्यामध्ये सारा अली खानचा साखरपुडा झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे साराचे चाहते तिच्या आयुष्यात येणारा ‘तो’ नेमका आहे तरी कोण? याबाबत जाणून घेण्यासाठी फार उत्सुक झाले आहेत.

व्हायरल पोस्ट

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टवर, सारा अली खानचा एका श्रीमंत उद्योगपतीसोबत साखरपुडा झाला आहे. रेडिटवर ही पोस्ट व्हायरल होते आहे. ज्यामध्ये म्हटलंय, ‘मी याआधीही सांगितलं आहे. त्यावेळी माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. पण साराचा साखरपुडा पार पडला आहे आणि दोन वर्षाच्या आत ती लग्नबंधनात अडकणार आहे. (Sara Ali Khan) सारा अली खान लवकरच ”मेट्रो इन दिनो” या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करणार आहे. साराने कोणताही नवा चित्रपट साइन केलेला नाही. त्यामुळे आता या सिनेमाच्या शुटिंगनंतर ती लग्नाच्या तयारीला सुरुवात करेल’.

पुढे लिहिलंय, ‘ज्याच्यासोबत सारा अली खानचं लग्न होणार आहे त्याच्यावर साराचं खूप प्रेम आहे. सारा खूप आनंदी आहे. साराच्या घरच्यांनीदेखील त्यांच्या नात्याला मंजूरी दिली आहे. विश्वास ठेवा किंवा ठेऊ नका पण वेळच सर्व काही सिद्ध करेल. सारा नव्या प्रवासासाठी खूप- खूप शुभेच्छा’. (Sara Ali Khan) रेडीटवर व्हायरल होणाऱ्या या पोस्टवर सारा अली खान किंवा तिच्या कुटुंबियांनी काहीही अधिकृत विधान केलेले नाही. आतापर्यंत सुशांत सिंग राजपूत, क्रिकेटर शुभमन गिल यांच्यासोबत साराचं नाव जोडलं गेलं होतं. पण तिने आपल्या नात्याविषयी कधीच अधिकृत विधान केले नाही. आता मात्र तिने नात्याची कबुली द्यावी अशी चाहत्यांची इच्छा आहे.