…म्हणून मी या प्रकरणाचा तपास करणार नाही ; IPS ज्युलियो रिबेरोंनी शरद पवारांचा प्रस्ताव नाकारला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब मुळे राज्यात खळबळ उडाली असून राज्यातील ठाकरे सरकार बॅकफूटवर गेल आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी माजी IPS अधिकारी ज्युलियो रिबेरो यांच्या नेतृत्वाखाली व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. परंतु खुद्द ज्युलियो रिबेरो यांनी हा प्रस्ताव नाकारल्याची माहिती समोर येत आहे.

आता मी 92 वर्षांचा आहे. या वयात मी तपास करु शकणार नाही. माझ्यात तेवढी ताकद नाही. अंगात तेवढी उर्जा असती तरी मी याप्रकरणाची चौकशी केली नसती. कारण, या माध्यमातून अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण केले जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया ज्युलिओ रिबेरो यांनी व्यक्त केली.

शरद पवार काय म्हणाले होते?

हे गंभीर प्रकरण आहे. पोलिसांकडून या प्रकरणी आरोप झाले आहेत. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी झाली पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले होते.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment