Jungle Safari Banned : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी!! 1 जुलैपासून जंगल सफारी बंद

Jungle Safari Banned
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Jungle Safari Banned । पावसाळा म्हंटल कि पर्यटन करण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. कोणी धबधब्याकडे पर्यटनाला जातात.. कोणी निसर्गाच्या सानिध्यात रमतात तर कोणी हिल स्टेशनला भेट देतात आणि मनसोक्त एन्जॉय करतात. आपल्या महाराष्ट्रात जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांची सुद्धा काही कमी नाही. अंगी दहा हत्तीचे धाडस भरलेले हे पर्यटक मोठ्या उत्साहाने भर पावसाळ्यातही जंगलात फिरतात.. आणि जंगलाचे एकूण वातावरण, तेथील वन्यजीवन यांचा अभ्यास करतात. परंतु तुम्ही यंदाच्या पावसाळ्यात जंगल सफारी करण्याचा विचार करत असाल तर आधी हि बातमी वाचा….. कारण वन विभागाने १ जुलैपासून पर्यटकांसाठी जंगल सफारी बंद करण्याची घोषणा केली आहे.

बंदचा निर्णय कशासाठी- Jungle Safari Banned

पावसाळ्याच्या दिवसात जंगल सफारी करताना अनेकदा चिखलामुळे वाहने रुततात. तसेच पावसाळ्याचे दिवस वन्यजीवांसाठी हा प्रजनन हंगाम असतो. अशा काळात त्यांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांच्या कामात अडथळा येऊ नये म्हणून वन विभागाने जंगल सफारी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए), नवी दिल्लीने व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील जंगल सफारीबाबत वन विभागाला मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. वन विभागाच्या या निर्णयामुळे आता जंगल सफारी करण्यासाठी पर्यटकांना पावसाळा संपण्याची वाट बघावी लागणार आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-पौनी-करहंडला वन्यजीव अभयारण्याच्या मुख्य क्षेत्रातील सफारी (Jungle Safari Banned) सेवा १ जुलैपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील. मुख्य वनसंरक्षक आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. किशोर मानकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. मात्र यातही थोडी दिलासा देणारा बातमी आहे. वन विभागाने जंगल सफारी पावसाळ्यासाठी स्थगित केली असली तरी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये मर्यादित सफारी प्रवेश उपलब्ध करून दिला आहे. जंगल सफारीसाठी इच्छुक पर्यटकांना पौनी पर्यटन गेट आणि सुरेवानी पर्यटन गेटवरून ऑफलाइन बुकिंग करून आनंद घेता येईल.

दरम्यान, जंगल सफारी (Jungle Safari Banned) हा एक थरारक अनुभव असतो , ज्यामध्ये पर्यटक जीप, हत्ती किंवा इतर साधनांद्वारे नैसर्गिक जंगल आणि वन्यजीव अभयारण्यांना भेट देतात. जंगल सफारीच्या माध्यमातून वाघ, सिंह, गेंडा, हत्ती आणि विविध पक्षी यांसारख्या वन्यजीवांना जवळून पाहण्याची संधी मिळते, तर निसर्गाची जैवविविधता आणि पर्यावरणीय व्यवस्था समजून घेण्याची सुद्धा संधी मिळते. भारतात जंगल सफारीसाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत, जसे कीरांथंबोर राष्ट्रीय उद्यान, राजस्थान, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम, नंदनवन जंगल सफारी छत्तीसगड: