Junk Food Side Effect | जंक फूडमुळे होतात 52 प्रकारचे आजार; लठ्ठपणाने लोक हैराण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Junk Food Side Effect | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. अनेक लोक तासान तास बसून काम करतात. त्याचप्रमाणे फास्ट फूड मोठ्या प्रमाणात खातात. या सगळ्याचा परिणाम म्हणजे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. आरोग्यासाठी पोषक नसलेले पदार्थ खाल्ल्याने अनेक प्रकारचे रोग वाढलेले आहेत. एका सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, जे लोक जंक फूड खातात. त्यांना 54 प्रकारचे आजार होत आहेत. तुम्हाला जर लठ्ठपणाच्या समस्यापासून सुटका मिळवायचे असेल, तर तुम्ही निरोगी जीवन शैली जगणे गरजेचे आहे. ताजे आणि सकस अन्न खाणे गरजेचे आहे.

आजकाल अगदी लहान मुले आणि वृद्धांमध्ये देखील लठ्ठपणाची (Junk Food Side Effect) ही समस्या वाढतच चाललेली आहे. जर या समस्यापासून लांब व्हायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तुमच्या योग्य आहाराला प्राधान्य दिले पाहिजे. त्याचप्रमाणे शारीरिक हालचाली, योगासने आणि व्यायाम देखील केला पाहिजे.

एका मेडिकल अहवालात तसेच सांगण्यात आलेले आहे की, जे प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ असतात. त्याचे सेवन आजकालचे लोक मोठ्या प्रमाणात करतात. तसेच त्यांच्या शारीरिक हालचाली देखील कमी आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणजे देशात वजन वाढण्याचे आणि लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. वृद्धांमध्ये देखील लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

शहरांमध्ये लठ्ठपणात वाढ | Junk Food Side Effect

राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणानुसार असे लक्षात आलेले आहे की, ग्रामीण भागातील लोकांच्या तुलनेत शहरांमध्ये असणाऱ्या लोकांमध्ये लठ्ठपणा जास्त प्रमाणात वाढत आहे. शहरांमध्ये हा वेग 29.8% आहे तर ग्रामीण भागामध्ये हा वेग 19.3% एवढा आहे. 18 ते 69 या वयोगटातील पुरुषांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण हे 22.9% आहे, तर वर्षाभरापूर्वी हे प्रमाण 18.9% एवढे होते. लठ्ठपणाचे प्रमाण महिलांमध्ये जवळपास 24% इतके झालेले आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या बदलत्या जीवनशैलीवर अवलंबून आहे. बाहेरचे रस्त्यावर केलेले पदार्थ आपण मोठ्या प्रमाणात खातो. यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो.