अतुल बेनके यांना सत्यशील शेरकर येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आस्मान दाखवतील?

junnar assembly election 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटलांना दिल्ली दरबारी पाठवणाऱ्या जुन्नरने विधानसभा मतदारसंघाने मात्र आमदारकीला नेहमीच वेगळा चेहरा निवडून दिला… त्यात राष्ट्रवादीकडून आमदार असणाऱ्या अतुल बेनके यांनी अजित दादा जिंदाबाद… म्हणत शरद पवारांना अंगावर घेतलं खरं… पण घड्याळाच्या म्हणजेच दादांच्या उमेदवाराला याच जुन्नरनं तब्बल 51 हजार मतं ही मायनस मते दिलीयेत… याचाच अर्थ बेनके यांची आमदारकी हवामान खात्याचा अंदाजानुसार रेड झोन मध्ये आहे… त्यामुळे जुन्नरच्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या रांगड्या मातीत यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणारय… आणि याची स्क्रिप्ट लिहिणारयत ते शरद पवार…

छत्रपती शिवरायांचा जन्म झालेल्या शिवनेरी किल्ल्याचा सहवास लाभलेला जुन्नर विधानसभा मतदारसंघ अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे… पुणे नाशिक आणि कल्याण अहमदनगर या दोन्ही हायवेला समांतर पसरलेल्या या मतदारसंघात शिवनेरी गड, जीवधन गड, हडसर गड, नाने घाट असा ऐतिहासिक ठेवा तर आहेच पण सोबतच कांदा, टोमॅटो, द्राक्ष, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देखील मोठी संख्या आहे… त्यामुळे जुन्नरच्या राजकारणात जम बसवायचा असेल तर शेतीमातीच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहावं लागतं…मतदार संघाचा इतिहास पाहायचा झाला तर नेहमी आघाडीच्या बाजूने कौल देणाऱ्या मतदारसंघाने राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून घड्याळाशी इमान दाखवलं… 2004 आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे वल्लभ बेनके इथून आमदार राहिले… पण इथून लोकसभेला मात्र शिवसेनेच्या आढळराव पाटलांना लीड मिळायचं… थोडक्यात लोकसभेला शिवसेना… आणि विधानसभेला राष्ट्रवादी… असा या मतदारसंघाचे एकूणच ट्रेंड होता… ठरल्यानुसार 2014 ला लोकसभेला जुन्नरनं आढळरावांच्या बाजूने झुकतं माप दिलं… मात्र विधानसभेला इंटरेस्टिंग रित्या इथून मनसेच्या शरद सोनवणे यांनी गुलाल उधळत इतिहास बनवला…

2014 ला मनसेला ज्या काही मोजक्या जागा मिळाल्या होत्या. त्यातली जुन्नर विधानसभा ही एक… यानंतर आमदार साहेब शिवसेनेच्या गोटात गेले… शिवसेनेकडून आमदारकीच्या रिंगणात असणाऱ्या आणि प्रत्येक निवडणुकीत नंबर दोन ला राहणाऱ्या आशा बुचके यांच्यासाठी हा मात्र मोठा धक्का होता… 2019 च्या विधानसभेला स्टँडिंग आमदार असल्याने शिवसेना शरद सोनवणे यांना तिकीट देणार हे कन्फर्म होतं… म्हणूनच आशा बुचके यांनी आपली ताकद लावून विधानसभेच्या आधीच लोकसभेला राष्ट्रवादीच्या कोल्हेंच्या बाजूने तब्बल 41 हजारांचं लीड देत छुपी मदत केली… अर्थात हे मातोश्रीच्या कानावर जाताच त्यांनी आशा बुचके यांची पक्षातून हकालपट्टी करत विधानसभेला शरद सोनवणे यांचंच नाव कन्फर्म केलं… त्यामुळे 2019 ला शिवसेनेकडून शरद सोनवणे तर राष्ट्रवादीकडून अतुल बेनके यांच्यात अटीतटीची लढत झाली… पण यावेळेस लोकसभेचं लीड विधानसभेला कायम राहत आमदार झाले ते अतुल बेनके… मतदारसंघात राष्ट्रवादीला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली.. आमदार, खासदार घड्याळाचाच असल्याने जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचा कार्यक्रम एकदम ओक्के असाच होता… पण राष्ट्रवादीत फूट पडली आणि पुन्हा एकदा जुन्नरमधील सत्तेचा सारा सारीपाट बिघडून गेला…

विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी अजितदादांची वाट धरली.. पण असं असूनही राष्ट्रवादीत आलेल्या आढळरावांना त्यांना लोकसभेला लीड देता आलं नाही… याउलट जुन्नर मध्ये तुतारीला तब्बल 51 हजारांचं लीड मिळाल्याने बेनकेंच्या पायाखालची वाळू सरकलीय… त्यात विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत असल्याने जुन्नरमध्ये तुतारी विरुद्ध घड्याळ असा अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळू शकतो… सध्या अतुल बेनके यांनीच शरद पवारांची घेतलेली भेट आणि शरद पवार आणि अजितदादा एकत्र येण्याच्या चर्चेला फोडलेलं तोंड पाहता जुन्नरचं राजकारण चांगलंच गरमा गरमीचं झालंय… या सोबतच मोहित चव्हाण, अनंतराव चौगुले, तुषार थोरात हे शरद पवार गटाकडून तर उध्दव ठाकरे गटाकडून माजी आमदार बाळासाहेब दांगट आणि माऊली खंडाळे यांची नावं इच्छुकांच्या यादीत असल्यानं तिकीट वाटपापासून प्रत्यक्ष मतमोजणी पर्यंत जुन्नरमध्ये घासाघीस असेल, त्यात शरद सोनवणे यांची भूमिका नेमकी काय असेल? यावरही इथल्या राजकारणाला कलाटणी मिळू शकते… पण सध्यातरी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवेल, तो जुन्नरमध्ये प्लस मध्ये राहण्याची शक्यता आहे… त्यामुळे शरद पवार जुन्नर मध्ये कोणावर विश्वास टाकतात? ते पहावं लागेल…

मतदारसंघाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर तालुक्याचा अर्धा भाग डोंगरी तर अर्धा पठारी असल्याचं दिसतं… मतदारसंघातील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला असणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची शिवसृष्टी हे जुन्नर मधील खास क इजीरून आकर्षणाचा मुद्दा आहे… शेतीच्या मुद्द्यावरून शेतकरी बांधव… तर मराठा आरक्षण आणि इतर प्रश्नांच्या आधारे इथला मराठा समाज हा शरद पवारांच्या पाठीशी इथे खंबीरपणे पाठीशी असल्याचं पाहायला मिळतं… त्यामुळे सत्यशील शेरकर जर इथून शरद पवार गटाकडून उमेदवार असतील तर स्टँडिंग आमदार अतुल बेनके यांच्यासाठी जिंकून येणं कठीण होऊन जाईल, असं मत राजकीय विश्लेषकही व्यक्त करतायत…त्यामुळे जुन्नर मध्ये सध्याच्या घडीला तरी आमदारकीची लढाई राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी असल्याने जुन्नरकरांचा कौल कोणत्या राष्ट्रवादीच्या पाठीशी राहतो? हे येत्या काळात पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे…बाकी तुम्हाला काय वाटतं? जुन्नरचा यंदाचा आमदार कोण आणि कोणत्या राष्ट्रवादीचा असेल? तुमचं पॉलिटिकल प्रिडक्शन आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…