हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणाची युट्यूबर आणि पाकिस्तानसाठी जासूसी करणारी ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) हिचे नवनवीन कारनामे आता समोर येऊ लागलेत. ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचं मोठं जाळं उघडं पडलं आहे. त्यात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येतेय. ज्योती मल्होत्राचे हाफिज सईद कनेक्शन आता समोर आलं आहे. लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचे घर ज्याला म्हंटल जाते त्या मुरीदकेमध्ये ज्योतीने तब्बल १४ दिवस हेरगिरीचे प्रशिक्षण घेतलं होत. स्वतः ज्योती मल्होत्राने च याबाबत कबुली दिली आहे. ज्योती किती वरपर्यंत पोचली होती याचा हा पुरावा आहे.
पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी युट्यूबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) पाकिस्तानला गेली होती. या काळात त्यांनी मुरीदके येथे १४ दिवस घालवले. या काळात तिने हेरगिरीचं प्रशिक्षण घेतल्याचं म्हटलं जातंय. हिसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत ज्योतीने याची कबुलीही दिली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मात्र चौकशीदरम्यान ती मुरीदकेहून कोणत्या मोहिमेवर भारतात परतली होती हे स्पष्ट होऊ शकले नाही. या मोहिमेत तिच्या शिवाय आणखी किती लोक आहेत? या संदर्भात हिसार पोलिस चौकशी करत आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे तेच मुरीदके आहे जिथे हजारो दहशतवादी घडवले गेले आहेत. मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाबनेही याच मुरीदके मध्ये प्रशिक्षण घेतलं होते.
ज्योतीला पाकिस्तानचा फ्री हॅन्ड – Jyoti Malhotra
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानातील कोणत्याही भागात फिरण्यास बंदी नव्हती. ती पाकिस्तानात जिथे वाटेल तिथे मुक्तपणे फिरत होती, तिला सुरक्षा पुरवणारे पाकिस्तान पोलिसांनीच होते. ज्योती मल्होत्राने अशा अनेक ठिकाणी भेट दिली जिथे सामान्य भारतीयांना जाण्यास मनाई आहे. यामध्ये पाकव्याप्त काश्मीरचे काही भाग तसेच इस्लामाबाद, कराची आणि मुरीदके येथील काही ठिकाणांचा समावेश आहे. भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या एहसान-उर-रहीम उर्फ दानिशच्या सूचनेवरून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे अधिकारी शाकीर यांनी ही सुविधा पुरवली होती.