हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आदरणीय सोनिया गांधीजी, गेल्या १८ वर्षांपासून मी काँग्रेस पक्षाची सेवा केली. मात्र मला हव्या त्या गोष्टी पक्षात मिळू शकल्या नाहीत. म्हणूनच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहे. या संदेशाचं पत्र सोनिया गांधींपर्यंत पोहचवत मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे महत्वाचे नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांनी काँग्रेसमधील आपली वाटचाल संपवली आहे.
मंगळवारी सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत ज्योतिरादित्य सिंदिया यांनी या घटनेला दुजोरा दिला. यानंतर पुढील कामकाज पूर्ण करण्यासाठी सिंदिया अमित शहा यांच्यासोबत पुढे गेले. सिंदिया यांना भोपाळमधून राज्यसभेवर संधी देण्यात येणार असल्याचं निश्चित आहे.
दरम्यान या घटनेमुळे मध्यप्रदेशात मोठा राजकीय भूकंप झाला असून कमलनाथ सरकार पडण्याच्या स्थितीत येऊन पोहचलं आहे. सोमवारी रात्रीच कमलनाथ सरकारमधील २० मंत्र्यांनी आपले राजीनामे दिले आहेत.