विशेष प्रतिनिधी। मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या भाजप प्रवेशातील चर्चांना उधाण आले आहे. स्वपक्षीयांना टोकल्याबद्दल काही कार्यकर्त्यांमध्ये सिंदिया यांच्याविषयी नाराजी आहे. मध्य प्रदेश सरकारने केलेल्या सरसकट कर्जमाफीला सिंदिया यांनी विरोध दर्शवला होता. दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी ठीक राहील असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.
याशिवाय काँग्रेसच्या पडझडीच्या काळात काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज असल्याचंही सिंदिया म्हणाले होते. मध्यप्रदेश सरकारमध्ये महत्वाची जबाबदारी असूनसुद्धा लोक आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नसल्याचं सिंदियांना मागील अनेक दिवसांपासून खटकत आहे.
दरम्यान मध्यप्रदेशातील भिंद येथील भाजपच्या जिल्हा समन्वयकाने प्रसिद्ध केलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह ज्योतिरादित्य सिंदिया यांचा फोटो लावल्याने बघणारे अवाक झाले आहेत. हा प्रकार कोणत्या धर्तीवर करण्यात आला हे अद्यापही समजू शकलेलं नाही.
इतर काही बातम्या-
मुख्यमंत्र्यांच्या ‘या’आदेशाने राधाकृष्ण विखे पाटील कात्रीत
वाचा सविस्तर – https://t.co/G4xwaEHFbT@Dev_Fadnavis @RVikhePatil @BJP4Maharashtra #Vidhansabha2019 #MaharashtraElections2019
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019
‘पवारांना हा पाटील कोण आहे हे अजून ओळखता आला नाही’ – चंद्रकांत पाटील
वाचा सविस्तर – https://t.co/ixmplrG0JX@ChDadaPatil @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra @BJP4India #Vidhansabha2019 #MaharashtraAssemblyElections
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019
भाजप सरकार हे धनदांडग्याचं; वनजमीन हडपण्याचा सरकारचा डाव – सीताराम येचुरी
वाचा सविस्तर – https://t.co/iRR78oiNKf@cpimspeak @SitaramYechury @CPIM_WESTBENGAL @BJP4India @PMOIndia #development #ModiHaiToMumkinHai
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 11, 2019