ज्योदिरादित्य सिंधिया भाजप कार्यालयाकडे रवाना, थोड्याच वेळात करणार भाजपात पक्षप्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली प्रतिनिधी | काँग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोमवारी होळीच्या दिवशी काँग्रेस पक्षाचा राजीनामा सादर केला. आता सिंधिया भाजप कार्यालयाकडे रवाना झाले असून ते थोड्याचवेळात भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

भाजप ज्योतिरादित्य सिंधिया यांना राज्यसभेवर घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिंधिया यांच्या भाजप प्रवेशामुळे मध्यप्रदेश काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कालपासून सिंधिया हे दिल्ली येथे ठाण मांडून बसले आहेत. सिंधिया भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा कालपासून माध्यमांत सुरु होती. आता सिंधिया भाजप कार्यालयाकडे रवाना झाले असून थोड्याच वेळात ते भाजपात प्रवेश करणार आहेत.

दरम्यान सिंधिया हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जात होते. गांधी यांच्या अत्यंत जवळचे असणार्‍या सिंधिया यांनी काँग्रेस पछाला रामराम ठोकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजप सिंधिया यांना काय आॅफर देणार यावर सर्वांचे लक्ष आहे.

Leave a Comment