टीम हॅलो महाराष्ट्र। मुंबईत ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या वन-डे सामन्यात फलंदाजी करताना यष्टीरक्षक ऋषभ पंतला दुखापत झाली होती. त्यामुळं ऐनवेळी केएल राहुलला या सामन्यांत यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडावी लागली होती. पंतला दुखापतीमुळं आराम देण्यात आला असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
पंताला दुखापत झाल्यानं त्याच्या जागी यष्टीरक्षक म्हणून आंध्र प्रदेशच्या के.एस भरत याचा संघात समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात पंतऐवजी भरत यष्टिरक्षण करणार आहे. प्रथम श्रेणी सामन्यात भरतने चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजीमध्ये देखील त्याने सातत्य ठेवले आहे.
भरतने ७४ प्रथम श्रेणी सामन्यात ४ हजार १४३ धावा केल्या असून त्यात ९ शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणीमध्ये त्याच्या नावावर एका त्रिशतकाची देखील नोंद आहे. यष्टीरक्षण करताना त्याने ५४ झेल, तर ११ विकेट घेतल्या आहेत.
UPDATE – K S Bharat named back-up wicket-keeper for 2nd ODI.
Full details here – https://t.co/c9Pk84rkbM #TeamIndia pic.twitter.com/ulOi6aKnRg
— BCCI (@BCCI) January 17, 2020