Kadaknath Chicken Farming | आजकाल लोक शेतीला जोडून अनेक व्यवसाय करत असतात. ज्यातून त्यांना खूप चांगले उत्पन्न मिळते. म्हणजेच एखादवेळी निसर्गाने साथ दिली नाही, तर शेतकऱ्याच्या शेतातून पीक येत नाही. परंतु जर एखादा जोडधंदा केला, तर त्यातून शेतकऱ्यांना फायदा होतो. अशातच अनेक लोक सध्या पोल्ट्री फार्मिंग हा व्यवसाय करत आहे. अनेक करून देखील त्यांची नोकरी सोडून पोल्ट्री फार्म व्यवसाय करत आहेत.
पोल्ट्री फार्मिंगमध्ये सध्या बॉयलर कोंबडी पालनाचा व्यवसाय हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमधून मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे. अनेक लोक इयर कंडीशन पोल्ट्री फार्म उभारत आहे आणि कोंबड्यांचे पालन देखील व्यावसायिक दृष्टिकोनातून करत आहे.
या कुकूटपालनात वेगवेगळ्या जातींच्या कोंबड्यांचे पालन केले जाते. काही संकरित जाती असतात, तर काही यामध्ये देशी जाती असतात. या कोंबड्याच्या जातीमध्ये कडकनाथ कोंबडी ही कोंबडीची जात पालनासाठी खूप महत्त्वाची जात आहे. यातून कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त कमाई होतो. कडकनाथ कोंबडी ही इतर जातींच्या कोंबडीपेक्षा खूपच वैशिष्ट्यपूर्ण असते. या कोंबडीचे मास आणि अंडी देखील खूप महाग विकले जातात.
लाखात होईल कमाई | Kadaknath Chicken Farming
जर तरुणांना पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा असेल तर कडकनाथ कोंबडी पालनाचा (Kadaknath Chicken Farming ) व्यवसाय त्यांच्यासाठी खूप फायद्याचा ठरू शकतो. कारण त्या कोंबडीच्या चिकनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. इतर कोंबड्यांच्या चिकन पेक्षा कडकनाथ कोंबडीचे दर जास्त आहे.
कडकनाथ कोंबडीची खासियत म्हणजे ती पूर्ण काळया रंगाची असते. आणि तिची चोच देखील काळी असते. एवढेच नव्हे तर तिचे रक्त मास अंडे देखील काळयारंगाचे असते. ही कोंबडी पाच ते सहा महिन्यांमध्ये तयार होते. या कोंबडीच्या चिकनचा प्रति किलो दर हा 1800 रुपये इतका आहे. आरोग्यासाठी देखील हे चिकन खूप फायद्याचे मानले जाते. कडकनाथ कोंबडीचे चिकनमध्ये खूप प्रथिने देखील असतात.
जे बॉडी बिल्डर असतात ते तरुण मोठ्या प्रमाणात कडकनाथ कोंबडीचे चिकन खातात. इतर कोंबड्यांच्या चिकनपेक्षा कडकनाथ कोंबडीचे चिकन चविष्ट लागते आणि दिवसेंदिवस या कोंबडीला मागणी देखील वाढत आहे.
कमी कालावधीत होतो जास्त नफा
या कडकनाथ कोंबडीचा व्यवसाय तुम्हाला कमी कालावधीत जास्तीचा नफा मिळवून देणार आहे. साधारणपणे चार महिन्यातच ही कोंबडी तयार होते. या कोंबडीचे एक अंडे 50 रुपयाला विकले जाते. या कोंबडीच्या पालनाचा खर्च देखील जास्त आहे. परंतु त्यातून नफा देखील तेवढाच जास्त मिळतो. या कोंबड्या जास्त प्रमाणात मध्यप्रदेश राज्यांमध्ये आढळून येतात.




