Saturday, March 25, 2023

कागलमध्ये शिवजयंतीनिमित्त ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी पेटवली शिवज्योत

- Advertisement -

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमध्येही शिवजयंती निमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे अवघ कागल शहर आज शिवमय झालं होतं. कागल शहरात शिव ज्योतीच आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

विशेष म्हणजे ग्रामविकास मंत्री राज्याचे हसन मुश्रीफ यांनी पायी अनवाणी चालत शिवज्योत आणली. हसन मुश्रीफही पूर्ण मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त कागलच्या शिवाजी चौकामध्ये महिलांनी पाळणाही म्हटला. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मंत्री मुश्रीफ यांनी दुग्धाभिषेक करत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हा सोहळा अनुभवण्यासाठी बराच मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

- Advertisement -

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.