Wednesday, March 29, 2023

दिल्लीतील शाळा, मदरशांमध्ये हनुमान चालीसा म्हणून घ्यावी; कैलाश विजयवर्गीयांचा केजरीवालांना सल्ला

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील निकलाबद्दल अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे. अभिनंदन करताना त्यांना एक सल्ला द्यायलाही विजयवर्गीय विसरले नाहीत.

दिल्लीतील शाळांमध्ये आणि मदरशांमध्ये केजरीवाल यांनी हनुमान चालीसा शिकवायला सुरुवात करावी, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत ट्विट करून त्यांनी केजरीवाल यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहचवल्या. दिल्ली निवडणुकीआधी अरविंद केजरीवाल यांनी आपण हनुमानभक्त असल्याचं म्हटलं होतं. याशिवाय निवडणूक निकालानंतरही त्यांनी हनुमानाची आपल्यावर कृपा असल्याचं म्हटलं होतं.

- Advertisement -

यावर विजयवर्गीय यांनी हनुमानाला शरण जाणाऱ्या कुणालाच हनुमान नाराज करत नाहीत असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील ज्या शाळा सुधारल्या तिथे आणि मदरशांमध्येसुद्धा हनुमान चालीसा म्हणायला सांगावी असा सल्ला भाजपच्या राष्ट्रीय महासचिवांनी दिला आहे.

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.