खाऊगल्ली | काजू कातली हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपरेंत सार्वांना आवडतो. तसेच भाऊबीज, रक्षाबंधन यावेळी ओवाळताना ताटात नेहमी काजू कातलीच असते. काजू कातली काजू पासून बनवल्यामुळे पौष्टिक आणि रुचकर होते. ती घरच्या-घरी बनवायला देखील सोपी आहे.
साहित्य –
१) १ वाटी काजू
२) ३\४ वाटी साखर
३) १\४ वाटी दूध पावडर
४) १\४ वाटी पाणी
कृती –
एक वाटी काजू मिक्सर मधून बारीक वाटून घ्या. काजूच्या वाटलेल्या मिश्रणात पाव वाटी दूध पावडर मिसळा.
दुसरीकडे गॅस वर पॅन ठेवा त्यात पाऊण वाटी साखर आणि पाव वाटी पाणी टाकून मंद आचेवर दोन तारी पाक बनवून घ्या.
पाक तयार झाल्यावर गॅस बंद करा, या पाकमध्ये काजू आणि दूध पावडरचे मिश्रण घालून चांगले मिसळून घ्या.
दोन मिनिट गॅस चालू करून मंद आचेवर मिसळले मिश्रण परतून घ्या.
दोन मिनिट परतून झाल्यावर हे मिश्रण थंड करण्यास बाजूला ठेवा. थंड झाल्यावर मिश्रणाचा गोळा करून मळून घ्या.
हा गोळा पोळपाटावर लाटून त्याच्या वड्या पाडा. तयार आहे काजू कतली.
( टीप – साखरेचा पाक नीट होते महत्वाचे आहे. )