हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kalavantin Durg) भारतात अनेक गड- किल्ले आहेत. ज्यांचे ऐतिहासिक सौंदर्य न्याहाळताना उरात अभिमानाची भावना निर्माण होते. अनेक पर्यटक असे गड किल्ले सर करत असतात. अशा पर्यटकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये मुंबई जवळील ‘प्रबळगड’चा समावेश आहे. अत्यंत सुंदर आणि लोभसवाणे दृश्य पाहायचे असेल तर एकदा गड सर करायला हवा असे अनेकजण सांगतात. मात्र त्याचवेळी असेही काहीजण आहेत जे या गडाविषयी बोलताना विविध भयानक गोष्टी आणि अनुभवांबद्दल बोलतात.
राज्यातील सुंदर ठिकाणांमध्ये प्रबळगडाचा समावेश आहे. मात्र या ठिकाणाबद्दल सांगितल्या जाणाऱ्या भयानक आणि भुताटकीच्या गोष्टींमुळे इथे रात्रीच्या वेळी जाण्यास मनाई आहे. (Kalavantin Durg) काही लोक सांगतात की, या ठिकाणी सूर्यास्तानंतर आत्मा फिरतात. या गडाबद्दल अशा अनेक कथा प्रचलित आहेत. चला तर सविस्तर माहिती घेऊया.
प्रबळगड कुठे आहे?
महाराष्ट्रात माथेरान आणि पनवेलदरम्यान हा किल्ला स्थित आहे. ‘प्रबळगड’ हा किल्ला ‘कलावंतीण दुर्ग’ नावाने ओळखला जातो. या किल्ल्यावर चढून जाणाऱ्या पर्यटकांना अनेक सुंदर दृश्य पहायला मिळतात. (Kalavantin Durg) तसेच या किल्ल्यावरून मुंबईचा काही भागदेखील दिसतो. त्यामुळे हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने इथे येत असतात. परंतु सूर्यास्तानंतर इथे भुतांचा वावर असतो, असे म्हटले जाते. त्यामुळे सूर्यास्त होण्याआधी गड उतरतात आणि रात्रीच्या वेळी इथे कुणी फिरकत देखील नाही.
इथे घडतात भुताटकीचे प्रकार
‘कलावंतीण दुर्ग’ हा किल्ला देशातील सर्वांत धोकादायक किल्ल्यांपैकी एक आहे. २३०० फूट उंच टेकडीवर बांधलेला हा किल्ला पहायला अनेक पर्यटक येत असतात. मात्र सूर्यास्तापूर्वी ते गड उतरतात. (Kalavantin Durg) याचे कारण इथे घडणारे भुताटकीचे प्रकार. या ठिकाणी पर्यटक म्हणून आलेल्या अनेक लोकांनी या ठिकाणी विचित्र घटना अनुभवल्याचे सांगितले आहे. इथे सूर्यास्तानंतर भयाण शांतता असते. ही शांतता विचित्र प्रकारांचे मूळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र काही लोकांनी अगदी खात्रीशीर इथे आत्म्यांचा वावर आहे, असे म्हटले आहे.
धोकादायक कलावंतीण दुर्ग (Kalavantin Durg)
कलावंतीण दुर्ग या किल्ल्यावर जाण्यासाठी खडक कापून पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. ज्या अतिशय धोकादायक आहेत. इतकेच नाही तर पायऱ्या चढताना आजूबाजूला रेलिंग किंवा दोरी बांधलेली नाही. त्यामुळे अनेक जण या पायऱ्या चढताना पडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
कुणी बांधला ?
बहामनी सल्तनतच्या काळात पनवेल आणि कल्याण किल्ल्यांचं निरीक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. १४५८ मध्ये अहमदनगर सल्तनतीचा पंतप्रधान मलिक अहमद याने कोकण प्रांतात या किल्ल्यावर विजय मिळवला आणि त्याने हा किल्ला ताब्यात घेतला होता. (Kalavantin Durg) तेव्हा या किल्ल्याचं नाव ‘मुरंजन किल्ला’ असे होते. मात्र जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला तेव्हा त्यांनी या किल्ल्याचं नाव बदलून राणी कलावंतीच्या नावावरून ‘कलावंतीण दुर्ग’ असे ठेवले.
महत्वाचे सांगायचे म्हणजे, विज्ञान भुताटकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. ते सांगत भूत, प्रेत, आत्मा अशा काहीही गोष्टी नसतात. लोकांचे समज गैरसमज आणि मनातील भीती भुताटकीच्या गोष्टी तयार करते. त्यामुळे आता या गोष्टींवर कितपत विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र अशा गोष्टी, वास्तू आणि कथा कायमच लोकांना आकर्षित करत असतात. त्यामुळे आपले कुतूहल आपल्याला अडचणीत टाकणार नाही, याची तेव्हढी काळजी घ्यावी. (Kalavantin Durg)