कमल हसन यांना कोरोनाची लागण, ट्विटद्वारे चाहत्यांना दिली माहिती; म्हणाले- ‘महामारी अजून संपलेली नाही’

नवी दिल्ली । अभिनेता आणि राजकारणी असलेले कमल हसन यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कमल हसनने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना याची माहिती दिली. हसनने उघड केले की, तो नुकताच अमेरिकेतून परतला होता, त्यानंतर त्याला “थोडासा सर्दी आणि खोकला” झालाहोता. यानंतर, त्याने भीतीपोटी कोविड चाचणी केली आणि ज्याचा निकाल पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर हासनने स्वतःला हॉस्पिटलमध्ये आयसोलेट केले आहे आणि सर्वांना स्वतःची काळजी घेण्यास सांगितले आहे. आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती देताना या अभिनेत्याने चाहत्यांना सावध केले आहे आणि सांगितले आहे की “महामारी अद्याप संपलेली नाही.”

कमल हसन यांच्यावर चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीतही त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर त्यांच्या उजव्या पायाच्या हाडात इन्फेक्शन झाल्याची तक्रार होती, त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.

कृषी कायदे मागे घेतल्यावर प्रतिक्रिया
कमल हसन यांनी नुकतेच केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला होता. सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना ते म्हणाले की,”वर्षभराहून अधिक काळ चाललेले शेतकरी आंदोलन प्रभावी ठरले आणि त्यांना विजय मिळाला.” त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, त्यांचा राजकीय पक्ष असलेल्या मक्कल निधी मय्यमनेही या कृषी कायद्यांना विरोध केला होता. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला पोहोचल्याचा क्षणही त्यांनी आठवला.

कमल हासनच्या ट्विटवर त्यांचे चाहते रिप्लाय करत आहेत आणि ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. कमल हसनची गणना भारतातील अशा सेलिब्रिटींमध्ये केली जाते ज्यांनी बॉलीवूड तसंच राजकीय जगतामध्ये हेडलाइन्स बनवल्या आहेत. अभिनेते-राजकारणी कमल हसन यांनाही त्यांच्या चित्रपट जगतातील योगदान आणि कामगिरीबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

You might also like