अजून किती तोंडं बंद कराल ?? कंगणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंग रजपूतच्या आत्महत्ये नंतर अभिनेत्री कंगना राणावत तिच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्या मुळे चर्चेत आली. त्यानंतर मुंबई पोलिसांवर शंका उपस्थित करून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर शी केल्याने तिच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली. त्यातच यामुळे कंगणा विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला. शिवसेनेने कंगनाचे मुंबईतील अनधिकृत ऑफिस वर बीएमसी द्वारे कारवाई केल्या नंतर कंगना बरीच खवळली आहे.तिने आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं आहे.तुम्ही किती लोकांची तोंड बंद कराल ?? असा सवाल कंगणाने केला आहे.

तुमच्या वडिलांची चांगली कर्मे तुम्हाला संपत्ती देऊ शकतात, पण आदर मात्र तुम्हाला स्वतःच मिळवावा लागेल, तुम्ही माझे तोंड बंद कराल, पण माझा आवाज माझ्या नंतर शंभर कोटींमध्ये परिवर्तीत होईल. तुम्ही किती लोकांची तोंड बंद कराल? आपण किती आवाज दाबाल?किती वेळ सत्यापासून लांब पळाल ?? तुम्ही कोणीच नाही आहात , तुम्ही फक्त घराणेशाहीचा नमुना आहात.

दरम्यान अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत केवळ 6 दिवसांसाठी राहायला आली असल्यामुळे मुंबई महापालिकेने तिला होम क्वारंटाइन केलेलं नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like