कंगुबाईवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे; अमोल मिटकरींची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं अस वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे.याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कंगना वर निशाणा साधताना तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हंटल की, कंगना रानौतच्या म्हण्यानुसार देशाला १९४७ मध्ये जे स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले. ह्या कंगुबाईने केलेलं हे वक्तव्य देशासाठी बलिदान देणाऱ्या तमाम देशभक्तांचा अपमान असून या बाईवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मेन्शन केलं आहे.

कंगना नेमकं काय म्हणाली-

एका मुलाखतीत कंगना रनौत हिनं स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका प्रश्नाचं उत्तर देताना कंगना म्हणाली की, “स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळालं असेल तर ते स्वातंत्र्य असेल का?  सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस या लोकांबाबत बोलायचं झाल्यास, या सर्वांना माहित होतं की रक्त सांडलं तर हे लक्षात ठेवावं लागेल की हे आपल्या भारतीयांचं नसेल. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हतं. भीक होती. खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं असे कंगना म्हणाली.

Leave a Comment