कंगनाची राजकारणात एन्ट्री? भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून आपल्या रोखठोक विधानांमुळे चर्चेत आहे. कंगना देशातील राजकीय परिस्थितीवरूनही आपलं मत व्यक्त करत असते. त्याच दरम्यान, कंगनाने भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे कंगना खरंच आता राजकारणात एन्ट्री करणार का ? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

पंचायत आजतकच्या व्यासपीठावर बोलताना कंगना रणौतने आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितलं आणि २०२४ लोकसभा निवडणुकीत आपण हिमाचल प्रदेश येथील मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजप सरकारला माझी साथ हवी असेल तर मी सर्व प्रकारे मदतीसाठी तयार आहे. जनतेची इच्छा असेल आणि भाजपने तिकीट दिलं तर ती निवडणूक लढवण्यास तयार आहे असं कंगनाने म्हंटल.

दरम्यान , कंगनाच्या या इच्छेबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना विचारलं असता त्यांनी कंगनाच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. कंगणा भाजपमध्ये आल्यास तिचे स्वागतच असेल. पंतप्रधान मोदींच्या कामांनी ती प्रभावित झाली आहे. कंगनाला तिकीट देण्याचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. कंगना पक्षात आली तर पक्ष त्या वेळी निर्णय घेईल असं नड्डा यांनी स्पष्ट केलं आहे.