कंगणाच्या ऑफिसवर BMC चा हातोडा; मुंबईला पुन्हा एकदा पाकिस्तानची उपमा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | कंगना राणावतच्या वांद्रे येथील ऑफिसमध्ये बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवत बीएमसीने कारवाई केली आहे. बीएमसीने ऑफिसवर हातोडा चालवल्याचे समोर येत आहे. तोडफोडीचा आवाज देखील ऑफिसमधून येत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

दरम्यान, पाकिस्तानची उपमा देत कंगनाने ट्विटरवर या कारवाईचे फोटो ट्विट केले आहेत. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने ऑफिसमधील अवैध बांधकामावर कारवाई केली आहे. ऑफिसमधील १२ अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, कंगना मुंबईत येण्यासाठी हिमाचल प्रदेशमधून रवाना झाली आहे.  ती चंदिगढ येथील विमानतळावर दाखल झाली आहे. आतील अधिकारी ऐकत नाहीत. विचार करण्याची वेळदेखील दिली नाही, अशी प्रतिक्रिया कंगनाच्या ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याने दिली आहे.

Leave a Comment