काँग्रेसमध्ये ‘युवा ब्रिगेड’; कन्हैयाकुमार – जिग्नेश मेवाणीचा होणार जाहीर प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय कम्यूनिष्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी हे काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. शहीद भगतसिंग यांच्या जन्मदिनी म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी प्रक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. या 2 तरुण नेत्यांच्या प्रवेशाने काँग्रेसला उत्तर भारतात नवं बळ मिळण्याची शक्यता आहे.

कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी जर काँग्रेसमध्ये सहभागी होणार असतील तर त्याने पक्षाला उत्तर भारताच्या राजकारणात ताकद मिळण्याची शक्यता आहे. कारण सपा-बसपा यांनी स्पष्ट केले आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेससोबत हात मिळवणी करणार नाहीत. पक्ष स्वत:च्या बळावर निवडणूक उतरेल. त्यामुळे कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी या युवा नेत्यांची काँग्रेसला गरज भासत आहे.

कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती.दुसरीकडे गुजरातमध्ये आमदार जिग्नेश मेवानी यांच्या रुपात काँग्रेसला तरुण आणि तडफदार चेहरा मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी मेवाणी यांनीही राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीत काँग्रेस प्रेवशाबाबत चर्चा करण्यात आली होती. हे दोन्ही नेते आता येत्या 28 सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Leave a Comment