Kanni Movie : अजिंक्य – हृताचे झाले ‘मन बावरेsss’; ‘कन्नी’मधील रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kanni Movie) येत्या ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘कन्नी’ या चित्रपटाची सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटातील पहिले गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. जे एक जबरदस्त रॅप साँग होते. यानंतर आता मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन प्रोडक्शन आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहयोगाने प्रदर्शित होणाऱ्या ‘कन्नी’ चित्रपटातील रॅपसाँगनंतर आता या चित्रपटातील सुंदर असे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

‘मन बावरे’ असे या नव्या रोमँटिक गाण्याचे बोल असून या प्रेमगीताला अभय जोधपूरकर आणि किर्ती किल्लेदार यांचे स्वर लाभले आहेत. तर अमर ढेंबरे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला विशाल शेळके यांनी अप्रतिम संगीत दिले आहे. प्रेमात असणाऱ्या प्रत्येकाच्या भावना दर्शवणारे हे गाणे आहे. (Kanni Movie) या गाण्यात हृता आणि अजिंक्यमधील प्रेम फुलताना दिसत असून दोघांचे गोड रोमँटिक क्षण यात पाहायला मिळत आहेत.

Mann Baware |  Kanni | New Marathi Video Song | Hruta D, Ajinkya R | Abhay J | Kirti K | VISHAL S
(Kanni Movie)दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ‘प्रत्येक गाण्यात एक कथा जोडलेली असते आणि काही गोष्टी त्या गाण्यातून व्यक्त होत असतात. तसेच हे गाणेही प्रेमभावना व्यक्त करणारे आहे. त्यामुळे कपल्सना हे गाणे नक्कीच आवडेल. आणि जे नाहीत त्यांना हे गाणे प्रेमात पाडेल. हळुवार, नजरेने खुलत जाणारे प्रेम या गाण्यातून दिसत आहे. या श्रवणीय गाण्याला संगीत टीमही उत्तम लाभली आहे. चित्रपटातील प्रत्येक गाणे हे वेगळ्या धाटणीचे आहे’.

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणाऱ्या ‘कन्नी’ या चित्रपटाचे लेखन- दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी ‘कन्नी’चे निर्माते आहेत. (Kanni Movie)