Monday, January 30, 2023

पतीच्या दीर्घायुष्यासाठी केला उपवास,पत्नीने सेल्फी पाहताच पतीची पोलीस ठाण्यात वरात

- Advertisement -

कानपूर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये पती पत्नीमध्ये चांगलाच ड्रामा झाला होता. यामध्ये पत्नीने पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवले होते. यानंतर एकच गोंधळ उडाला. पत्नीने पुजेनंतर पतीबरोबर सेल्फी घेतला. पण पतीच्या फोनमधला सेल्फी पाहून तिचा पारा आकाशाला टेकला आणि त्यानंतर प्रचंड वाद झाला.

उत्तर भारतामधील पंचाग प्रतिपदा ते अमावस्या असे असते. त्यामुळे त्यांच्याकडे नुकतीच वटपौर्णिमा झाली. या वट पौर्णिमेच्या निमित्ताने कानपूरमध्ये एका महिलेनेदेखील पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत केले होते. वटवृक्षाची पुजा केल्यानंतर पत्नी घरी आली. यानंतर तिने पतीकडे सेल्फीसाठी आग्रह केला. त्यानंतर दोघांनी पतीच्या फोनमध्ये सेल्फी काढला. यानंतर पत्नीने हा सेल्फी पाहण्यासाठी पतीचा फोन घेतला. पण सेल्फी पाहिल्यानंतर इतर फोटो पाहताना पत्नीला पतीच्या फोनमध्ये दुसऱ्या एका महिलेबरोबरचे त्याचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो दिसले मग काय तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

- Advertisement -

या महिलेने पतीच्या मोबाइलमधले फोटो पहिले आणि तिने रागाच्या भरात पुजेचं ताट फेकून दिले आणि चांगलाच गोंधळ घातला. यानंतर तिने आपल्या पतीचा हाथ धरून त्याला फरफटत पोलिस ठाण्यात घेऊन गेली. पोलीस ठाण्यातदेखील तिने गोंधळ घातला. तिने आपल्या पतीच्या मोबाईलमधील अश्लिल फोटो पोलिसांना दाखवत पतीवर कारवाई करण्याची मागणी केली. या सर्व प्रकारामध्ये पतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. पती पत्नीसमोर वारंवार हाथ जोडून तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. पण पत्नी त्याचे काहीही केल्या ऐकायला तयार नव्हती. अखेर पतीने पत्नीचे पाय धरले आणि तिची माफी मागितली, त्यानंतर ती शांत झाली. यानंतर पोलिसांनी या दोघांची समजूत काढून त्यांना घरी पाठवले.