पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी कानपूरमध्ये दोन गटांत दगडफेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी कानपूर दौऱ्यावर आहेत. ते कानपूरमध्ये दाखल झाले आहेत. पण त्यांच्या दौऱ्याआधीच एक अनपेक्षित घटना घडली आहे. कानपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी मोठा राडा झाला आहे. दोन समाजात वादाची ठिणगी पडल्यामुळे हा राडा झाला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे यामध्ये दोन गट एकमेकांवर दगडफेक (Stone throwing) करताना दिसत आहेत.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या गावी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कानपूर दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी कानपूरमध्ये विविध कार्यक्रमांचं उद्घाटन करणार आहेत. विशेष म्हणजे मोदी दुपारी तीन ते साडे तीन वाजेच्या सुमारास कानपूरमध्ये दाखल देखील झाले आहेत. पण ते कार्यक्रमस्थळी जाण्याआधीच कानपूरमध्ये दोन गटांमध्ये जोरदार राडा (Stone throwing) झाला. या दगडफेकीत दहापेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. मोदींच्या दौऱ्याआधी शहरात मोठी दगडफेकीची (Stone throwing) घटना घडल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद पैगंबर आणि इस्लाम धर्म यांच्यावर अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. नुपूर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात प्रतिक्रिया देताना संबंधित वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कानपूरमध्ये काही नागरिकांनी आजचा दिवस बाजार बंदची हाक दिली होती. पण काही नागरिकांचा त्याला विरोध होता. याच मुद्द्यावरुन दोन गटांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारी आणि दगडफेकीत (Stone throwing) झाले.

हे पण वाचा :
IND vs SA T20 Series : 2 वर्षांनंतर भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी BCCI ने बदलला ‘हा’ महत्वाचा नियम

‘या’ penny stocks ने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 6,000 टक्के नफा !!!

मला आता कारणे सांगू नका, पाणीप्रश्न तत्काळ मार्गी लावा ; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता व्याजाचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार

पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये; संजय राऊतांची दानवेंवर टीका

Leave a Comment