कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत दि. 6 ऑक्टोंबर रोजी वाटाणा, पावटा व शेवगा तेजीत आला आहे. (कराड बाजार भाव) तर हिरवा वाटाण्याची थोडीसी आवक वाढूनही महागला आहे. वाटाणा 100 ते 150 रूपये प्रति किलो दराने आला आहे. पावटा 70 ते 80 रूपये प्रतिकिलो दर असून शेवगा 70 ते 90 रूपयांनी मार्केटमध्ये विकण्यास आला आहे.
हिरवा वाटण्याची आवक मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. किरकोळ विक्रीत भाजी मंडईत हिरवा वाटाणा 150 ते 200 रूपयांनी किलो दराने मिळत आहे. टाॅमटोलाही किंचितसा दर वाढला आहे. सरफरचंद नवरात्री उत्सवात कमी दराने होते, मात्र आता दसऱ्याच्या दिवशी प्रति 10 किलोमागे 300 रूपयांनी महागले आहे. लिंबूचे दर मात्र मार्केटमध्ये निम्याने गडगडला. (कराड बाजार भाव)