Monday, January 30, 2023

Karad Bajarbhav : कराड शेती उत्पन्न बाजारसमितीत आज कोणत्या शेतमालाला काय भाव मिळाला? चेक करा

- Advertisement -

कराड : शेतकरी मित्रांनो रोजचा बाजारभाव चेक करण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याच चॅनलच्या बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. कारण Hello Krushi या मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही घरी बसून महाराष्ट्रातील हव्या त्या बाजारसमितीमधील अन् पाहिजे त्या शेतमालाचा ताजा बाजारभाव स्वत; पाहू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krsuhi असं सर्च करायचं आहे. त्यानंतर हॅलो कृषीचे मोबाईल app install करुन तुन्ही रजिस्टर केलं की त्यानंतर तुम्हाला लाईफटाईम सर्व सेवा मोफत मिळतात.
Click Here to Download Hello Krushi App

आजचा दिवस शेती उत्पन्न बाजार समिती कराडसाठी मोठ्या उलाढालीचा ठरला. आज कराड येथे टाॅमेटोची 200 कॅरेट, वांगी 100 करंडी तर भेंडी 50 करंडी इतकी आवक झाली. टाॅमेटोला आज कराड येथे 50 ते 100 रुपये प्रती 10 कि.लो. असा बाजारभाव मिळाला. वांग्याला 100 रुपये ते 200 रुपये प्रती 10 किलो बाजारभाव मिळाला.

- Advertisement -

कराड बाजारसमितीत शेवग्याची 15 पोती आवक झाली असून शेवग्याला 700 ते 850 रुपये प्रती १० किलो बाजारभाव मिळाला. तर कारल्याला 250 रुपये भाव मिळाला. आज दिवसभरात ढब्बू मिरचीची 150 Kg इतकी आवक झाली. ढब्बू मिरचीला 300 रुपये इतका भाव मिळाला.

दरम्यान, फळांमध्ये चिक्कू 50 कॅरेट, बोरे 70 गोणी, डाळिंब 50 कॅरेट, मोसंबी 25 गोणी इतकी आवक झाली. चिक्कूला 300 रुपये तर केळीला 150 रुपये प्रती 10 किलो असा भाव मिळाला. आज कांद्याची एकुण आवक 350 पिशवी इतकी झाली असून कांद्याला 200 रुपये प्रती 10 किलो भाव मिळाला.

Karad Bajarbhav