कराड प्रतिनिधी | संतोष गुरव
सातारा जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीचे मतदान काल पार पडले. मतदानानंतर आता आज सकाळी 11 वाजल्यापासून प्रत्यक्ष मत मोजणीस सुरुवात झाली. कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीत व्यापारी व आडते गटात स्वर्गीय विलासराव पाटील काका रयत पॅनलचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. हि बातमी ब्रेकिंग असून सातत्याने अपडेट होत आहे. निकाल जसा जसा जाहीर होत आहे त्याप्रमाणे तुम्हाला याच बातमीत तो वाचायला मिळेल. तेव्हा हॅलो महाराष्ट्राची बातमी रिफ्रेश करा.
नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार, सोसायटी गटातील सर्व साधारण परवर्गातून शेतकरी विकास पॅनलमधून जगदीश जगताप (900 मते), मानसिंगराव जगदाळे (मते 891), दयानंद पाटील (मते 900), उध्दवराव फाळके (मते 898), विनोद जाधव (मते 90७), दत्तात्रय साळुंखे (मते 883), जयवंत मानकर (मते 881) विजयी झाले आहेत. तसेच सोसायटी सर्व साधारण महिला प्रवरगातून स्व. विलासकाका पाटील उंडाळकर गटातील रयत पॅनलमधील विजयमाला मोहिते 910 मते तर शेतकरी विकास पॅनलमधील रेखाताई पवार 926 मते घेऊन विजयी झाले आहेत.
कराड बाजारसमितीचे रोजचे बाजारभाव तुम्हाला मोबाईलवर कसे मिळतील?
शेतकरी मित्रांनो आता आपल्याला कराड बाजारसमितीमधील रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवता येणार आहेत. यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. या अँपवर आपल्याला कराड बाजारसमितीमधील रोजचे बाजारभाव घरी बसून पाहता येतात. यामुळे कोणत्या दिवशी कशाला किती रुपये दर मिळाला याची माहिती उपलब्ध होते. आपल्याला योग्य तो दर मिळत असेल तरच आपला शेतमाल बाजारसमितीत घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यास या अँपचा फायदा होतो. यासोबतच सातबारा उतारा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, सरकारी योजना, जमीन खरेदी विक्री आदी सेवाही या अँपवर विनामूल्य देण्यात येत आहेत. आजच तुम्हीसुद्ध Hello Krushi डाउनलोड करून या उपक्रमाचे लाभार्थी बाणा.
कराड कृषी उत्पन बाजार समितीमध्ये माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर गटाचे उमेदवार जयंतीलाल पटेल यांना 259 तर जगन्नाथ लावंड यांना 255 मते मिळाली. या गटात दोन्ही उमेदवाराच्या विरोधात उभे राहिलेल्या विरोधी शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार संतोष पाटील यांना 80 तर राजेश शहा यांना 98 मते मिळाली.
सातारा जिल्हात 93.33% असे विक्रम मतदान मतदारांनी केले आहे. त्यामुळे उमेदवारांचे भवितव्य हे मतदान पेटीमध्ये बंद आहे. यामुळे नेमका गुलाल कोणाच्या अंगावर पडणार आणि कोणाला हार पतकरावी लागणार हे पाहणे उत्सुकताच ठरणार आहे.
विजय उमेदवार व मिळालेली मते
स्व. विलासराव पाटील उंडाळकर रयत पॅनेल विजयी उमेदवार पुढील प्रमाणे,
सोसायटी गट सर्वसाधारण प्रवर्ग
विजयकुमार कदम 886
दिपक (प्रकाश) पाटील 898
महिला प्रवर्ग
इंदिरा जाधव-पाटील 914
इतर मागास प्रवर्ग
सर्जेराव गुरव 922
विमुक्त जाती भटक्या जमाती गट
संभाजी काकडे 924
ग्रामपंचायत गट
सर्वसाधारण प्रवर्ग
संभाजी चव्हाण 928
राजेंद्र चव्हाण 937
आर्थिक दुर्बल घटक प्रवर्ग
शंकर इंगवले 972
अनुसूचित जाती- जमाती प्रवर्ग
नितीन ढापरे 943
व्यापारी अडते गट
जयंतीलाल पटेल 259
जगन्नाथ लावंड 255
माजी मंत्री बाळासाहेब पाटील – डॉ. अतुल भोसले पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे,
सोसायटी गटातील सर्वसाधारण प्रवर्गतून : जगदीश जगताप : 900, मानसिंगराव जगदाळे : 891, दयानंद पाटील : 900,
उध्दवराव फाळके : 898, विनोद जाधव : 907
महिला प्रवर्गतून
रेखाताई पवार : 926
पराभूत झालेल्या उमेदवाराची यादी पहा
सोसायटी गटातील सर्व साधारण परवर्गातून : रयत पॅनलमधून 1)विनयकुमार कदम : 886, 2) मोहन माने : 857, 3) अशोक पाटील : 900, 4) दीपक पाटील व शेतकरी विकास पॅनल उमेदवार उध्दवराव फाळके यांना 898 अशी समान मते मिळाली. 5) शैलेश चव्हाण : 862, 6) प्रमोद कणसे : 880, 7) वामन साळुंखे : 814
सोसायटी सर्व साधारण महिला प्रवरगातून : शेतकरी विकास पॅनलमधील मालन पिसाळ : 897 तर स्व. विलासकाका पाटील उंडाळकर रयत पॅनलमधील इंदिरा जाधव पाटील : 914
सोसायटी गटातील सर्व साधारण इतर मागास वर्गमधून : शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार फिरोज इनामदार : 921 मते तर सर्व साधारण विमुक्त जाती भटक्या जमाती परवर्गमधील शेतकरी पॅनलचे उमेदवार मारुती बुधे काकडे : 919 मतांनी विजयी झाले
बाजार समितीच्या सोसायटी मतदार गटातील १८९९ पैकी १८४९ मतदारांनी मतदान केले. ग्रामपंचायत गटातील १९२२ मतदारापैकी १८७७ मतदान कले. व्यापारी गटातील ३७२ मतदारापैकी ३४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकुण ४१९३ मतदारापैकी ४०७५ मतदारांनी मतदान केल्याने सरासरी ९७.१९ टक्के मतदान झाले. निवडणूक निरीक्षक तहसीलदार विजय पवार, निवडणुक निर्णय अधिकारी संदिप जाधव यांच्या उपस्थितीत मतमोजणीला प्रारंभ झाला आहे.