Karad Bus Accident : कराडजवळ विद्यार्थ्यांची बस 20 फूट खड्ड्यात कोसळली; 40 जण जखमी

Karad Bus Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Karad Bus Accident । सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. कराड तालुक्यातील वाठार गावात एक विद्यार्थ्यांच्या सहलीची बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून सर्वांच्या सर्व ४० प्रवासी जखमी झाले आहेत. यातील ५ जण अतिशय गंभीर जखमी आहेत. हे सर्व विद्यार्थी हे नाशिक जिल्ह्यातील आहेत. सहलीच्या निमित्ताने ते कराडच्या दिशेला आले होते. मात्र या सहलीला मोठं गालबोट लागलं आहे.

नेमकं काय झालं? Karad Bus Accident

सातारा कागल महामार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. महामार्गाच्या कामामुळे या संपूर्ण पट्ट्यात अनेक ठिकाणी गाड्या वळवण्यात येत असतात. नवनवीन उड्डाणपुलाची उभारणी सुरु असल्याने या भागात वाहतूक कोंडी सुद्धा रोजचीच झाली आहे. अनेक ठिकाणी बॅरिगेट्स आहेत. रस्त्याच्या बाजूने खुदाईचे काम सुरू आहे. यामुळे दररोज अपघात होत आहेत. तसाच अपघात आज वाठार हद्दीत पाहायला मिळाला. बस चालकाला रस्त्यावरील भलामोठा खड्डा दिसलाच नाही आणि नियंत्रणाबाहेर जाऊन बस २० फुटी खड्डयात पडली. अचानक मोठा आवाज आल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील लेट बी. पी. ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, पिंपळगाव बसवंत या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सहलीची हि बस होती. या बसमध्ये जवळपास ४० विद्यार्थी आणि शिक्षक होते.

अपघातानंतर (Karad Bus Accident) पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. अपघाताची अन्य कोणती कारणे आहेत का याचाही तपास पोलीस घेत आहेत. परंतु प्राथमिक अंदाजानुसार, बस चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात झाला असं बोललं जात आहे. जखमींना कराड येथीलच कृष्णा हॉस्पिटल मध्ये तातडीने दाखल करण्यात आलं आहे. यातील ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जातंय. सहलीचा आनंद घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर क्षणात संकट कोसळल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.