कराड शहर १०० % कोरोनमुक्त; तालुक्याची लढाई अद्याप सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणारे 7 व क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा दाखल असणारा 1 असे एकूण 8 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. या 8 रुग्णांना बरे झाल्यामुळे आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. कराड शहरातील सर्व कोरोना बाधित रुग्ण आता बरे झाले असून कराड शहर १०० % कोरोनमुक्त झाले असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र कराड तालुक्याची लढाई अद्याप सुरु आहे.

सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणारे मलकापूर ता. कराड येथील 45 वर्षीय महिला, वनवासमाची ता. कराड येथील 40 व 60 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 24 वर्षीय आरोग्य कर्मचारी, कराड येथील मंगळवार पेठेतील 65 वर्षीय महिला, मलकापूर ता. कराड येथील 49 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दहिवडी ता.माण येथील 25 वर्षीय युवक असे एकूण 8 जणं करोना मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 114 नागरिक कोराना मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे.

दरम्यान, आजपर्यंत कराड मध्ये 89 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर कराड पाटण तालुक्यात आतापर्यंत एकुण 121 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. कराड तालुक्यात आता 32 कोरोना अॅकटिव पेशंटवर उपचार सुरु आहेत.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment