कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदेचा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्रास जाणवू लागल्यानंतर शिंदे यांनी दवाखान्यात तपासणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन महिन्या पासुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दगदग व धावपळ झाल्याने मागील दोन दिवसापासून थोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच ठीक होऊन पुन्हा तुमच्या सेवेस हजर असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील. अशा आशयाची फेसबुक पोस्ट टाकून शिंदे यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
शिंदे यांना सध्या उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे. शिंदे यांचा अहवाल पॉझिटिव आल्याने शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. याबाबतची माहिती सायंकाळी सातच्या सुमारास मिळाली. बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी यांच्या मीटिंगला नगराध्यक्षा अनुपस्थित होत्या. मात्र त्यांचे पती उमेश शिंदे हे या बैठकीला उपस्थित होते.