कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या दोन वर्षात 6 गुन्हेगारी टोळ्या व 9 सराईत गुन्हेगार असे एकुण 47 गुन्हेगार तडीपार करण्यात आले आहेत. तर बुधवारी दि. 20 रोजी एकाचवेळी 14 जणांना तडीपार करण्यात आले आहे. कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या धडाकेबाज कामगिरीने कराड शहरातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडलेले आहे.
दि. 20 रोजी कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार बजरंग उर्फ बज्या सुरेश माने (वय- 26), पवन सुनिल भोसले (वय- 21), योगेश दादा भोसले (वय- 20), प्रतिक विजय साठे (वय- 28), शुभम सुनिल जाधव (वय- 22), गणेश संजय वायदंडे (वय- 21, सर्व रा. बुधवार पेठ कराड), विशाल उर्फ चिंग्या श्रीकांत घोडके (वय- 29, रा. रैनाक गल्ली शनिवार पेठ कराड), आकाश उर्फ सोन्या निलेश रावखंडे (वय- 27, रा. चांभारगल्ली, गुरुवार पेठ कराड), आदित्य मदन घाडगे (वय- 24), संकेश राजेश डांगे (वय-23, दोन्ही रा. शुक्रवार पेठ कराड), सत्यजीत गोरख सुर्यवंशी (वय- 23,रा. शिक्षक कॉलनी, शिवाजी स्टेडियम जवळ, शनिवार पेठ कराड) या टोळीस पोलीस अधीक्षक सातारा यांचे आदेशान्वये संपुर्ण सातारा जिल्हा तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा व कडेगाव तालुक्यातून 6 महिन्याकरीता हद्दपार केलेले आहे.
तर दुसरी टोळीतील कुंदन जालिंदर कराडकर (वय- 25, रा. गजानन हाऊसिंग सोसायटी सैदापूर ता. कराड), अर्जून यशवंत कुंभार (वय- 32, रा. शनिवार पेठ कराड), अभिजीत संजय पाटोळे (वय- 22, रा. शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी कराड) यांना संपुर्ण सातारा जिल्हा तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा व कडेगाव तालुक्यातून 1 वर्षे कालावधीकरीता हद्दपार केलेले आहे.
हद्दपारीची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक अजीत बोऱ्हाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहा. पोलीस निरीक्षक विजय गोडसे, सहा. पोलीस निरीक्षक अमित बाबर, सफौ सतीश जाधव, संतोष सपाटे, पोहवा नितीन येळवे, जयसिंग राजगे, पोना संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे यांनी ही कारवाई केली आहे.