कराड डीबीची कारवाई : चोरीतील टायरसह ट्रकचा क्लिनर पोलिसाच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | करवडी ता. कराड येथून ट्रकचे टायर चोरीस गेल्याची घटना घडिली होती. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने टायर चोरास ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीस गेले 16 चाकी ट्रकचे 1 लाख 44 हजार रुपये किंमतीचे टायर हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी ट्रकवरील क्लीनर सुखदेव अर्जुन गोडसे (वय 36) रा. महुद बुद्रूक ता. सांगोला असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर ट्रकचालक दत्तात्रय गोडसे फरार आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, करवडी गावच्या हद्दीतील कदम वस्ती येथे कराड ते पुसेसावळी जाणाऱ्या रस्त्यावर अपसर चांदपाशा सय्यद रा. संतोषनगर, पुणे यांच्या मालकीचे सोळाचाकी ट्रकचे १ लाख ४४ हजार रुपये किंमतीचे ७ टायर डिस्कसह अज्ञाताने चोरुन नेले होते. तसेच चोरट्याने ट्रकमधील ताडपदरी व नायलॅन रस्सी बंडलही लंपास केले होते. याबाबतची फिर्याद सोमवारी ३ रोजी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे सोपविण्यात आला.

कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार महेशकुमार लावंड, सज्जन जगताप, शशिकांत काळे, अमित पवार यांच्या पथकाने या तपासाला गती दिली. त्यामध्ये ट्रकचे टायर व इतर साहित्य हे सदर ट्रकवरील चालक दत्ता गोडसे व क्लिनर सुखदेव हुलवान यांनीच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. चोरी केलेले टायर आटपाडी जि. सांगली येथून हस्तगत करुन जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी या पथकाने पिंपरी ता. माळशिरस जि. सोलापुर येथून संशयीत गोडसे यास ताब्यात घेतले. दरम्यान, संशयीतास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ८ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Comment