कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्यासह त्यांच्या कुटूंबातील चौघेजण कोरोनाबाधित आढळल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. आजअखेर तालुक्यात तब्बल 300 कोरोना योद्धे बाधित झाले आहेत. त्यात आरोग्य विभाग व पोलिस दलातील कोरोनाबाधित सर्वाधिक आहेत.
कराडचे पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील अन्य दोन कर्मचारीही बाधित झाले आहेत. कराड तालुक्यातील आणखी चार पोलिस
अधिकारी, 41 हवालदार तर गृहरक्षक दलाचे 10 जवानही बाधित झाले आहेत.
कोरोनाचा कराड तालुका व शहरात कहर वाढला आहे. कोरोना योद्धांनाही कोरोनाच्या कचाट्यात अडकावे लागत आहे. आरोग्य खात्यापेक्षाही पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे. गुरव यांच्यासह त्यांच्या घरातील चार सदस्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे कराडच्या पोलिस दलात खळबळ उडाली आहे.