कराड बाजारभाव : मार्केटला वाटाणा, शेवगा तेजीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत वाटाणा व शेवगा तेजीत आला आहे. कराड बाजार समितीत बुधवारी दि. 17 रोजी 20 पोती वाटाण्याची आवक झाली असून 10 किलोचा दर 1 हजार ते 1 हजार 200 रूपये होता तर शेवगा 40 पोती आवक असून 400 ते 500 रूपये 10 किलोचा दर होता.

येथील स्वा. सै. शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये (10 किलोचा दर पुढीलप्रमाणे) वागी -150 ते 250 रूपये, टोमॅटो – 300 ते 400 रूपये, भेंडी – 200 ते 300 रूपये, दूधी – 100 ते 120 रूपये, कारले – 150 ते 200 रूपये, फ्लाॅवर – 130 ते 160 रूपये, कोबी – 40 ते 70 रूपये, आले – 150 ते 200 रूपये, हिरवी मिरची – 100 ते 150 रूपये, शेवगा – 400 ते 500 रूपये, पावटा – 250 ते 300 रूपये, हिरवा वाटाणा – 1 हजार ते 1200 रूपये, गवारी – 300 ते 400 रूपये, घेवडा – 250 ते 350 रूपये, ढब्बू मिरची – 300 ते 400 रूपये, काकडी- 80 ते 100 रूपये, पडवळ – 200 ते 300 रूपये, कांदा – 50 ते 250 रूपये, बटाटा – 50 ते 200 रूपये व लसून – 300 ते 700 रूपये असा दर आहे.

कराड शेती उत्पन्न बाजार समितीत आज वाटाण व शेवगा तेजीत होता. तर कोंथीबीर, मेथी, पालक व शेपू पालेभाज्याही शेतकऱ्यांनी आणलेल्या होत्या. केळीची आवक 3 टन आलेली आहे. मार्केट कमिटीत बऱ्याच दिवसानंतर बोरे यांची आवक झालेली आहे.

 

Leave a Comment