कराड नगरपरिषदेचे वादग्रस्त मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची उंचलबांगडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड नगरपरिषदेचे सतत चर्चेत व पदाधिकाऱ्याच्यासोबत वादग्रस्त असणारे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची उंचलबांगडी करण्यात आली आहे. डांगे यांच्या जागी भुसावळ येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डांगे यांच्या १ वर्षासाठीच्या मुदतवाढीवर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर आता त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याने शहरात चर्चांना उधान आले आहे.

कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी शहराला अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत. मात्र त्याचसोबत नगरपरिषदेच्या ठराविक नगरसेवकांशी जमेची तर अनेकांशी वादग्रस्त भूमिका हा मुद्दा नेहमीच चर्चेत राहिलेले मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु या मुदतवाढीला अनेक पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. त्यातूनच दिलेली मुदतवाढ रद्द करण्यात आली असून तेथे प्रशासकीय कारणास्तव श्री. डाके यांना नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश नगर विकास खात्याकडून देण्यात आला आहे.

मुख्याधिकारी यशवंत डांगे हे सप्टेंबर 2017 मध्ये कराडला मुख्याधिकारी म्हणून रूजू झाले. त्यानंतर डांगे यांनी 2018 आणि 2019 या दोन वर्षात कराड नगरपालिकेस “स्वच्छ सर्वेक्षण”मध्ये चांगले यश मिळवून दिले होते. 2019 मध्ये कराड नगरपालिकेचा देश पातळीवर प्रथम क्रमांक आला. यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांचे बक्षीस नगरपालिकेस मिळाले आहे. 2020 सालच्या स्पर्धेचा निकाल प्रलंबित असून यातही कराड नगरपालिका देशपातळीवर बाजी मारण्याची शक्यता आहे. हे यश मिळवून देण्यात यशवंत डांगे यांचा सिंहाचा वाटा आहे.

Leave a Comment