…अन्यथा सामूहिक आत्मदहन करणार; कराड पालिकेच्या अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचा इशारा

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड पालिकेतील अनुकंपा प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांची नियुक्तीची ऑर्डर न मिळाल्यास सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा आज दिला आहे. नियुक्तीच्या ऑर्डरच्या मागणीसाठी अनुकंपा प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांकडून आमरण उपोषण केले जात आहे. दरम्यान येत्या तीन दिवसानंतरही काही निर्णय झाला नाही तर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

याबाबत कर्मचाऱ्यां माहिती अशी दिली की, जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी 25 फेब्रुवारी 2021 च्या पत्रान्वये शासन निर्णयानुसार उचित कार्यवाही करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड पालिकेतील कर्मचाऱ्यांची 31 मार्च 2022 रोजी सातारा येथे ऑर्डर देण्यात आली आहे. मात्र, कऱ्हाडमधील अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांची ऑर्डर अद्यापही काढण्यात आलेली नाही.

गेल्या 15 ते 18 वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळेल, या अपेक्षेने हे कर्मचारी कार्यरत आहेत. आता ऑर्डर मिळाल्याने हे कर्माचारी आमरण उपोषणास बसले आहेत. जर तीन दिवसांत काही निर्णय घेऊन ऑर्डर दिली नाही तर 14 एप्रिलला सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला आहे.