Karad खूनाचा उलगडा : दाजीला अडकविण्यासाठी मेव्हुण्याकडून महिलेचा खून

कराड | सोमवारी 3 जानेवारी 2022 रोजीचे कार्वे (ता.कराड जि. सातारा) गांवचे हद्दीत भैरवनाथ मंदिरा शेजारुन कृष्णा नदीचे पात्राकडे जाणारे रोडवरील अज्ञात महिलेचा खून सातारा गुन्हे शाखा आणि कराड तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे. बहिणीस त्रास देणाऱ्या दाजीला अडकविण्यासाठी मेव्हुण्याने सदरील महिलेचा खून केल्याचे तपासात पोलिसांना सांगितले आहे. मयत वनिता आत्माराम साळुंखे (वय – 30 वर्षे रा. महिंद ता. पाटण जि. सातारा) असे खून झालेल्या  महिलेचे नांव असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. तर शरद हणमंत ताटे (वय-30, रा. येरवळे, ता. कराड) असे संशयित आरोपीचे नांव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कार्वे गांवचे हद्दीत भैरवनाथ मंदिरा शेजारुन कृष्णा नदीचे पात्राकडे जाणारे रोडवरील अज्ञात महिलेचा खून झाला होता. अंदाजे 25 ते 30 वर्षीय महिलेला अज्ञात इसमाने, अज्ञात कारणास्त, अज्ञात साधनाने मारुन तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याकरीता गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा स्त्रीवरील अत्याचाराचा असल्याने स्थानिक गुन्हे शाखा सातारा व कराड तालुका पोलीस ठाण्याचे पथक पाठविण्यात आले होते.

सदर पथकानें कराड येथे जावून कराड तालुका पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांच्या सोबत गुन्हयाच्या घटनास्थळास भेट दिली. तेथील परिस्थितीची माहिती घेवून पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे तेथे तपास केला असता मयताच्या अंगावर एक चिठ्ठी मिळाली. त्या चिठ्ठीमध्ये “एका इसमाचे नांव नमुद होते व त्याने मला लग्न करतो म्हणून आणले, माझ्याशी संबंध ठेवले व माझ्या बरोबर लग्न करत नसून मला मारहाण करून माझ्याशी संबंध ठेवले आहेत मी जीव दिला किंवा मला काय झाले तर त्यास तो जबाबदार आहे वगैरे मजकूर लिहला होता” तसेच चिठ्ठीमध्ये नांव नमुद असलेल्या इसमाच्या मेव्हुण्याकडे कौशल्याने तपास केला असता. त्याने सदरचा खून असल्याचे निष्पन झाले. असून त्याच्या चिठ्ठीमध्ये नांव नमुद असलेला इसम त्याच्या बहिनीस चिठ्ठीमध्ये नाव असलेला इसम  मारहाण करून त्रास देत असल्याने त्यास खूनाच्या गुन्ह्यात अडकविण्याकरिता आरोपीने मयत वनिता आत्माराम साळुंखे (वय ३० वर्षे रा. महिंद ता. पाटण जि. सातारा) या महिलेचा खून केला असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.

पोलीस अधीक्षक सातारा अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधोक्षक सातारा अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड डॉ. रणजित पाटील यांच्या सूचनाप्रमाणे व पोलीस निरीक्षक किशोर घुमाळ, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा तसेच पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, पो.हवा. शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, रोहित निकम, विशाल पवार, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन व कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत कांबळे, पो. हवा. धनंजय कोळी, संजन जगताप, उत्तम कोळी यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईमध्ये सहभागी होते.