Karad News : कराड तालुक्यातील 3 जण तडीपार; दरोडा, घरफोडी, वाहनांची जाळपोळ केल्याचे आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहनांची जाळपोळ करणाऱ्या टोळीचा प्रमुखासह तिघांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. शाहीद ऊर्फ सोन्या शब्बीर मुल्ला (वय- 28, टोळी प्रमुख), शाहरुख शब्बीर मुल्ला, (वय- 29, दोघेही रा. कोणेगांव. ता. कराड, जि. सातारा व अमित अंकुश यादव (वय 36, रा. कवठे ता कराड ) अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांविरोधात तडीपारीचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नोव्हेंबर 2022 पासुन 7 उपद्रवी टोळ्यांमधील 19 जणांविरोधात तडीपाराची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान टोळीतील तीन जनांविरोधात उंब्रज पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 55 अन्वये तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावातची चौकशी कराडचे उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांनी केली होती. प्रतिबंधक कारवाई करुनही सदर टोळीच्या संशयित हालचालीस प्रतिबंध झालेला नाही. त्यांचे कृत्यांमुळे सर्व सामान्य नागरीकांच फार मोठे आर्थिक व शारिरीक नुकसान झाले आहे.

हद्दपार यांना कायद्याचा धाक नसुन ते बेकायदेशीर कारवाया करीत आहेत. त्यांना सुधारणेची संधी देवुनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधुन त्यांचेवर कडक कारवाई करणे करीता मागणी होत होती. हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 अन्वये 3 इसमांचेवर दोन वर्षाकरीता सातारा जिल्हा हद्दीतून हद्दपारीचा आदेश दिला आहे.

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाचे वतीने अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पो. ना. प्रमोद सावंत, पो. काॅ.केतन शिंदे, म.पो. काॅ. अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला. या कारवाईचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.