कराडमध्ये विजय स्तंभास अभिवादन करत ‘विजय दिवस’ दिमाखात साजरा; हुतात्मा जवानांचे केलं स्मरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

भारतीय सैन्यदलानाने बांग्लामुक्ती संग्रामात मोठा विजय प्राप्त केला. त्याप्रित्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून गेली २२ वर्षे येथे विजय दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. यंदा मोठा सोहळा न घेता मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याही समाधीस्थळीही अभिवादन आणि विजय दिवस चौकातील विजय स्तंभास अभिवादन करण्यात आले. भारतीय सैन्यदलाच्या विजयाचे साक्षीदार असेलेल्या कर्नल पाटील यांच्या पुढाकारातून येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयम व परिसरात दरवर्षी विजय दिवस समारोह समितीच्यावतीने भारतीय सैन्यदलाच्या सहकार्याने १३ ते १६ डिसेंबर दरम्यान विजय दिवस समारोहाचे आयोजन करण्यात येते. देशात दिल्लीनंतर फक्त तो कऱ्हाडमध्ये साजरा केला जातो. त्यामुळे त्याला मोठे महत्व आहे.

विजय दिवस समारोहासाठी दरवर्षी लष्करी शस्त्रास्त्र, जवान, बॅण्डपथक, श्वानपथक आदींच्या चित्तथरारक कसरतींचेही आयोजन केले जाते. त्याला सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो आबालवृध्द उपस्थीत राहतात. विजय दिवस हा कऱ्हाडची ओळख बनला आहे. दरवर्षी वेगवेगळ्या कसरतींनी आणि कार्यक्रमांनी गेली २२ वर्षे हा विजय दिवसचा सोहळा अविस्मरणीय ठरतो. त्यामुळेच त्याची लोकप्रतियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र यंदा कोरोनाचे मोठे संकट उभे आहे. त्यावर सध्यातरी सोशल डिस्टन्सींग एवढाच पर्याय आहे. त्याचा विचार करुन विजय दिवस समारोह समितीच्यावतीने यंदाचा विजय दिवस समारोहाचा मोठा कार्यक्रम स्थगीत करण्यात आला आला.

मात्र विजय दिवसानिमीत्त विजय स्तंभास आणि जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी खासदार श्रीनिवास पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, निवृत्त कर्नल एम. डी. कुलकर्णी, नगरसेवक सौरभ पाटील, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, लेफ्टनंट कमांडर दिग्वीजय जाधव, आॅनररी लेफ्टनंट बाबुराव कराळे, दिलीप चव्हाण, सलीम मुजावर, अंशुमन पाटील, ए. आर. पवार, विजय दिवस समीतीचे अरुण जाधव, विनायक विभुते, चंद्रकांत जाधव, विलासराव जाधव, प्रा. बी. एस. खोत, प्रा. रजनीश पिसे, प्रा. जालींदर काशिद, रमेश पवार, दिलीप पाटील, विष्णु पाटसकर, रत्नाकर शानभाग, हेमंत पवार, भरत कदम, मिनल ढापरे, पौर्णिमा जाधव, मिनाक्षी जाधव, अरुणा जाधव, साधना राजमाने, आसमा इनामदार, सतीश बेडके, सुनिल कणसे, दिपक कणसे, यांनी विजय स्तंभास अभिवादन केले. शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक काकासो करबंळेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. कराड नगरपालिका व शहर पोलिसांनी या कार्यक्रमास सहकार्य केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment